सुबोध आणतोय 'लेडीज स्पेशल बस'

    05-Jul-2022
Total Views |

bhave
 
 
 
मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेता म्हणून सुबोध भावे याची ख्याती आहे. सुबोध भावे यानी गेली अनेक वर्ष नाटक, चित्रपट या क्षेत्रात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करून, प्रत्येक व्यक्तिरेखेत जीव ओतून काम करणे, ही त्याची खासियत आहे. असा हा अभिनेता सध्या स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येत आहे. ही त्यांची कोणतीही नवी भूमिका नसून झी मराठीच्या एका नव्या कोऱ्या कार्यक्रमाची घोषणा आहे.
 
 
 
झी मराठीवरील एका लेडीज स्पेशल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहे असे म्हटले जात आहे . ‘बस बाई बस’ असं या कार्यक्रमाचं नाव असून या नव्या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये एक बस दिसत असून सुबोध स्त्रियांना त्यात बसायचे आवाहन करत आहे. ‘स्त्रियांसाठी राखीव’ असे या बसवर लिहिलेले दिसत आहे.
 
 
 
 
सुबोध भावे या टीझरमध्ये सांगत आहेत की ‘या सगळ्याजणी कुठे चालल्यात माहितेय? मी घेऊन येतोय खास स्त्रियांसाठी राखीव बस’. झी मराठीच्या अनेका चाहत्यांनी या अनोख्या टीजरचे खूप कौतुक केले आहे. सध्या तरी सुबोध भावेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करेल अशी शक्यता टीझरवरून वर्तवली जात आहे. या टीझरवरून हा एक खास महिलांसाठी बनवलेला ट्रॅव्हल शो असू शकतो असे सुद्धा म्हटले जात आहे. याबद्दल अजून नक्की काहीच सांगितले नसले तरी सुबोध आठवड्यात दोन दिवस भेटीला येणार या बातमीनेच त्याचे चाहते खुश झाले आहेत. अनेकजण या शोची आतुरतेने वाट बघत आहेत. तर एका महिलेने विचारले आहे की ‘कुठे करायची सीट बुक माझी एक सीट बुक कराल ?' त्यामुळे ह्या कार्यक्रमात वेगळेपण असणार आहे, असे चाहते सांगत आहेत. शुक्रवार- शनिवार आमच्या घरी तुमचे स्वागत आहे वाट पाहतोय त्या दिवसाची ’ असे सुद्धा चाहते म्हणत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.