Bappi Lahiri passes away : असं होतं बप्पीदा आणि लतादीदींचं नातं...

    16-Feb-2022
Total Views | 145

bappi lehri 
 
 चित्रपटसृष्टीतील गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांना गमावून अवघे १० दिवसही झाले नव्हते आणि आज गायक - संगीतकार बप्पी लहरींनी देखील जगाचा अखेरचा निरोप घेतला.
 

bappi lehri 
 
 बप्पी लहरी हे लता मंगेशकर यांना आपली आई मानत असत.
 

bappi lehri 1 
 
लतादीदींना जाऊन अवघे दोन आठवडेही पूर्ण झाले नाहीत आणि अशातच बॉलीवूडमध्ये डिस्को म्युजिक ला एक नवी ओळख देणारे आणि गोल्ड मॅन म्हणून ओळखले जाणारे गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनीदेखील आपला कायमचा निरोप घेतला आहे.
 
bappi 
 
बप्पी लहरी हे मंगेशकर कुटुंबियांच्या अगदी जवळचे होते हे तर आपल्या सर्वानाच माहिती आहे. पण वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी बप्पीदांनी आशा आणि उषा मंगेशकर यांना एका गाणे शिकवले होते. कारण ते गाणं स्वतः बप्पीदांनीच त्यांच्या साठी बनवले होते.
 

bappi 
 
लता दीदींच्या निधनाची खबर मिळताच बप्पी लहरींनी आपल्या सोशल मीडियावर लतादीदींचा एक फोटो शेअर करत लतादीदींना "माँ" असं संबोधलं होत.
 

bappi 
 
परंतु लता दीदी आणि बप्पी लहरींच्या अश्या आकस्मित निधनाने संगीतसृष्टीने आपले दोन अनमोल हिरे गमावले हे मात्र नक्की.  
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121