दोन दुचाकींवर दोन पाय ठेऊन अजय देवगणचा बॉलिवूडमध्ये झाला होता प्रवेश

    23-Nov-2022
Total Views |

har ha
 
 
 
मुंबई : पूर्वी ऍक्शन सिन चित्रित करण्यासाठी बॉडी डबल नसायचे. आणि म्हणूनच अजय देवगणला फुल वर काटे चित्रपटातल्या पहिल्याच सिंची भीती वाटत होती. अजय देवगण एकावर एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत असतो. परंतु त्याचा पहिला वाहिला चित्रपट फूल और काटे सर्वच चाहत्यांच्या लक्षात आहे. तब्ब्ल ३१ वर्षांपूर्वीच्या या चित्रपटातून अजयने बॉलिवूड जगात पदार्पण केले होते.
 
 
एका मुलाखतीत बोलताना अजय म्हणाला होता की चित्रपट क्षेत्रात येणाची इच्छा माझी नव्हती तर माझ्या वडिलांची होती. ते हिरो म्हणून नाव कमावू शकले नाहीत म्हणून त्यांनी माझ्याकडून त्यांचे स्वप्न पूर्ण करवून घेतले. अजय देवगणचा दृश्यम २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच काळ २२ नोव्हेम्बर रोजी अजयच्या फूल और काटे चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अजयच्या फिल्मी कारकिर्दीचा आढावा घेतला आहे.
 
 
वीरू देवगण सध्या हयात नसले तरी एका मुलाखतीत ते म्हणाले होते, एसी मध्ये झोपणाऱ्या मुलाला अंगमेहनत करायला लावणं खूपच कठीण काम होतं. चित्रपटात यशस्वी व्हाचसेल तर मेहेनतीला पर्याय नसतो. पहिल्या चित्रपटासाठी अजयला तयार करताना एक वर्षाचा कालावधी लागला असेही ते यावेळी म्हणाले होते. पहाटे उठवून जुहू किनाऱ्यावर व्यायाम आणि धावण्यासाठी पाठ्वण्यापासून सुरुवात होती. व्यायामासाठी नवी जिम बनवण्यात आली होती. नृत्य शिकवायला शिक्षक येत असत. परंतु पहाटे लवकर उठण्यास मात्र अजयला ५ ते ६ महिने जावे लागले. आपल्या वडिलांची आठवण करून देताना अजय म्हणाला बाबा नसते तर मी करू शकलो नसतो. त्यांनी सर्वच सिन माझ्याकडून उत्तमरीत्या करवून घेतले.
 
 aja
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.