मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधवला कोरोना

    दिनांक  05-Apr-2021 15:52:05
|

Priyadarshan jadhav_1&nbs
 
मुंबई : बॉलीवूडप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव यालादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मिडीयावरून दिली. त्याने सोशल मिडीयावर दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याआधी अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारली असून लवकरच ते चित्रीकरणास सुरुवात करण्यार असल्याचे सांगितले.
 
 
 
प्रियदर्शन जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर म्हंटले आहे की, "मी सर्वांना कळवू इच्छितो की सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी कोरोनाचे सर्व नियम पाळत आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी ही विनंती , काळजी घ्या.” प्रियदर्शन जाधव सध्या ‘लव्ह सुलभ’ या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटात प्रियदर्शनने लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी बजावत आहे. प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे कलाकार या चित्रपटात आहेत.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.