कडक निर्बंधांमुळे मासेमार बांधव संकटात

    दिनांक  16-Apr-2021 14:30:25
|

news _4  H x W:
मुरूड जंजिरा (प्रकाश सद्रे) : कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे मासेमारी व्यवसाय आधिक अडचणित आले आहेत. पावसाळी मासेमारी १ जूनपासून बंद होणार आहे. समुद्रात मासळी मिळण्याचे प्रमाणही घटले आहे.


news _3  H x W: 
 

सध्या जी मासळी मिळते त्याला मुंबईत वितरण व्यवस्था नसल्यानें चिंताजनक स्थिती आहे. मासेमारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.


news _2  H x W:
 
 
आता मासेमारांनी अखेर नौका किनाऱ्यावर ओढून ठेवण्यास सुरुवात केली असून पुन्हा गावाकडे जाण्याची तयारी केली आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत लीलावासाठी फारसे व्यापारी येत नसून भाव देखील मिळत नाही. त्यामुळे खलाशी वर्ग आणि नाखवा मंडळींना काहीच आर्थिक लाभ होत नाही.
 
 

news _1  H x W:मुरूडचे मासेमार नाखवा दशरथ मकू, हे अखेर मुंबईतील मासेमारी सोडून मुरूडला काल परतले. नौका किनाऱ्यावर ओढण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. यंदा विचित्र बदलते हवामान आणि कोरोना स्थितीमुळे मासेमारीचे बहुतेक हंगाम वाया गेले असून उदरनिर्वाह ची चिंता यांना भेडसावत असल्याचे दिसून आले.
 news  1  1 _1  
 


२०१७ पासूनचा ट्यवधी रुपयांचा डिझेल परतावाही मासेमारांना मिळालेला नाही, अशीही व्यथा त्यांनी मांडली आहे. खोल समुद्रातील मासेमारीचे उत्पादन घटले आहे. त्याच प्रमाणे किनाऱ्यावर देखील मासे मिळणे जिकरीचे झाले आहे. समुद्र खाडीच्या पट्ट्यात मिळणाऱ्या मासळीवरच मासेमारांचा उदरनिर्वाह असल्याचे चित्र फिरताना दिसते.
 
 


news  1  1  new`  _1 
शिवाय बाहेरगावाहून आणलेल्या सुख्या मासळीची विक्री करून काहींना गुजराण करावी लागत आहे. २० वर्षांपूर्वी ओली मासळी मुबलक आणि स्वतः मिळत असे, दिवसे गणिक चित्र बदलत गेले आणि मच्चीमार मासळीच्या संकटात सापडल्याचे चित्र आता दिसून येत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.