रेमडीसीवीरचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न (वाचा सविस्तर)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2021
Total Views |


remdi_1  H x W:



नवी दिल्ली : केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग (स्वतंत्र प्रभार) आणि रसायन व खते,मंत्री मनसुख मांडवीय यांनी 12 आणि 13 मार्च 2021 रोजी रेमडीसीवीर औषधाच्या सर्व विद्यमान उत्पादक आणि इतर हितधारकांबरोबर झालेल्या बैठकीत रेमडीसीवीरच्या उपलब्धतेच्या समस्येचा आढावा घेतला. या बैठकीत रेमडीसीवीर औषधाचे उत्पादन / पुरवठा वाढवण्याचा तसेच त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


रेमडीसीवीरच्या सात उत्पादकांची सध्याची स्थापित क्षमता दरमहा 38.80 लाख इतकी आहे. सहा उत्पादकांना दरमहा 10 लाख उत्पादन क्षमता असणार्‍या सात अतिरिक्त जागांसाठी जलदगतीने मंजुरी देण्यात आली आहे. दर महिन्याला आणखी 30 लाख उत्पादन लवकरच सुरु होईल. यामुळे महिन्याला सुमारे 78 लाख उत्पादन क्षमता वाढीस लागेल.


अतिरिक्त उपाय म्हणून, देशांतर्गत बाजारपेठेत रेमडीसीवीरचा पुरवठा वाढवण्यासाठी 11.04.2021 रोजी डीजीएफटीद्वारे रेमडेसिविर इंजेक्शन व रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर, निर्यातीसाठी राखून ठेवलेल्या अंदाजे 4 लाख रेमडीसीवीर कुपींचा पुरवठा उत्पादकांकडून देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी वळवला जात आहे. ईओयु / सेझ युनिट्स देखील देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी सक्षम केली जात आहेत.


कोविड विरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी, रेमडीसीवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी स्वेच्छेने या आठवड्याच्या अखेरीस 3500 रुपयांहून कमी केली आहे.


रुग्णालय / संस्था पातळीवरील पुरवठा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश रेमडीसीवीरच्या उत्पादनांना देण्यात आले आहेत.


औषध महानियंत्रकांनी राज्ये आणि केंद्र सरकारच्या अंमलबजावणी प्राधिकरणांना रेमडीसीवीरचा काळा बाजार, साठवणूक आणि वाढीव दर आकारण्याच्या घटनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.


नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी (एनपीपीए) रेमडीसीवीरच्या उपलब्धतेवर सातत्याने देखरेख ठेवत आहे.


@@AUTHORINFO_V1@@