अॅप निर्मिती क्षेत्रात 'ड्रॅगन'ला जखमी करण्याच भारताला यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2021
Total Views |

HD  _1  H x W:

 
 

निमशहरी व ग्रामीण भागांमध्ये भारतीय बनावटीच्या अॅप्सच्या मागणीत वाढ

मुंबई : भारत-चीन सीमेवर जवानांशी झालेल्या झटापटीत २० जवान हुतात्मा झाले. ऐन कोरोना संकट असताना शेजारील विस्तारवादी चीनविरोधात एक संतापाची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात आली. परिणामी २०२० या वर्षात चीनी अॅप्सची भारतीय बाजारपेठेतील हिस्सेदारी घटल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. तर नव्या अॅप इन्स्टॉलेशनचा विचार केला तर भारतीय बनावटीच्या अॅप्सचा वापर वाढल्याची आकडेवारी आहे.
 
 
 
मोबाईल वर्क रिलेशन आणि मार्केट अॅनेलिसिसची आंतरराष्ट्रीय संस्था अॅप्सफ्लायरच्या (AppsFlyer) अहवालानुसार, 'स्टेट्स ऑफ अॅप मार्केटींग इन इंडिया इन २०२१'मध्ये भारतातील निमशहरी भागांमध्ये 'आत्मनिर्भर' बनण्याच्या दृष्टीकोनातून ही वृद्धी झाल्याचे म्हटले जात आहे. भारतीय बनावटीच्या अॅप्सना बाजारात असलेली मागणीही वाढल्याने हा निकाल पहायला मिळाला. परदेशी अॅप्सना मागे टाकून मोबाईल क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवण्यात आले आहे.
 
 
 
एकूण ७.३ अब्ज इन्स्टॉलेशनचे विश्लेषण
 
 
अॅप्सफ्लायरच्या अधिकाऱ्यांच्या मते, चीनी अॅपची बाजारातील हिस्सेदारी २९ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतीय अॅप्स २०२०मध्ये उद्धवलेल्या चीनविरोधाचा फायदा सर्वांना झाला आणि बाजारातील हिस्सेदारी ४० टक्क्यांनी वाढली. या बाजारात गतीने इस्त्रायल, अमेरिका, रशिया आणि जर्मनी या देशांतील अॅप्सही शर्यतीत आहेत. चीनला आव्हान देण्यासाठी जगभरातील देशांची तयारी सुरू आहे. या अभ्यासाअंतर्गत १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत भारतात एकूण ७.३ अब्ज इनस्टॉल करण्यात आलेल्या अॅप्सचे विश्लेषण करण्यात आले आहे. मनोरंजन, आर्थिक, शॉपिंग, गेमिंग, ट्रॅव्हेल, न्यूज, खाद्यपदार्थ, हॉटेल्स व्यवसाय आणि दैनंदिन गरजांनुसार लागणाऱ्या ४ हजार ५१९ अॅप्सचा नव्याने सामावेश झाला आहे.
 
 
 
शॉर्ट व्हीडिओ अॅप्सची चलती
 
 
केंद्र सरकारने डिजिटल स्ट्राईक करत टीकटॉकसह अन्य चीनी अॅप्सवर बंदी घातली. यानंतर भारतीय बनावटीच्या शॉर्ट व्हीडिओ अॅप्सची मागणी वाढत चालली आहे. चिंगारी, रोपोसो आणि विविध अॅप्सची निर्मितीही झाली आहे.
 
 
स्थानिक मागणीत वाढ
 
 
अॅप्सफ्लायरच्या एका निरिक्षणानुसार, डाटा सॅम्पलमध्ये ९३३ अब्ज अॅप्स नव्याने सुरू झाले तर ३ दशलक्ष अॅप्सना कोरोना काळात व नंतर नव्याने लॉन्च करण्यात आले. स्थानिक अॅप्सचा वापर करणारे उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. मोबाईल डेटा स्वस्त झाल्यामुळे मोबाईल डेटा आणि हॅण्डसेटच्या उपलब्धतेमुळे टीअर 2, 3 आणि 4 शहरांमध्ये गेमिंग, वित्तीय आणि मनोरंजन सेवा देणाऱ्या अॅप्सच्या बाजारपेठेची वृद्धी झाली. भारतीय डेव्हलपर्ससाठी हा बदल सकारात्मक मानावा लागणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@