शहरापासून कोसो दूर गावात पोहोचले रेल्वे राज्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2021
Total Views |
Danavae _1  H x





नवी दिल्ली : ईशान्य भारताच्या नागालँडमध्ये शोखुवि गाव तसं धावपळीच्या गजबजलेल्या शहरांपासून कोसो दूर... मात्र, केंद्र सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत अंतिम घटकांना प्रमुख प्रवाहात आणण्याचा विचार आहे. नागालँडच्या शोखुवि गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रेल्वे पोहोचली.
 
 
 
 
 
 


तिथल्या शोखुवि रेल्वे स्थानकामुळे गावाने रोजगारभूमिख उद्योग सुरू केले. गावाचा रोजगार वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गावाचे विशेष कौतूक केले आहे. "स्थानिक संस्कृती, पर्यावरण तथा विकासाचा अनोखा संगम आहे. इथे 'कनेक्टिव्हिटी नात्यांचीही आहे आणि 'इन्फ्रास्ट्रक्चर'चीही आहे.", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नुकतिच केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी या स्थानकाला भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. मंत्री-अधिकाऱ्यांच्या या दौऱ्यावेळी ग्रामस्थही भारावून गेले.

@@AUTHORINFO_V1@@