'बॉलीवूडमध्ये मराठी कलाकारांना हिणवलं जातं'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

urmila_1  H x W



मुंबई :
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधील घराणेशाही तसेच बॉलीवूड ड्रग्स माफिया कनेक्शन यांसारख्या विषयांवरील चर्चांना उधाण आले. यादरम्यान कंगनानं बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा वापर होतो असा आरोप केला. त्यानंतर कंगनाच्या या आरोपांवर काहींनी समर्थन केले तर काहींनी विरोध केला.


यादरम्यान, बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं. “घाटी लोगो को हिंदी भी नही आती”, "ये क्या घाटी कपडा पहना है, उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है" अशा शब्दात हिणवण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट तिने केला. बॉलिवूडमध्ये ही वस्तूस्थिती यापूर्वीही होती आणि आताही आहे असे तिने स्पष्टपणे सांगितले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ती बोलत होती. यापूर्वीही तिने कंगनावर चर्चा करावी, तिच्याविषयी बोलावे, असं मला वाटत नाही हे म्हटल आहे. तसेच, या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, याचा पैसा कोण देत आहे. तुमच्या आमच्यासारखा टॅक्स पेयर माणूसचं तिच्या सुरक्षेचा खर्च उचलतोय. तिने क्लेम केला होता की, माझ्याकडे माफियांची नावे असून ती मला नार्को टेस्ट डिपार्टमेंटकडे द्यायची आहेत, असं म्हणून तिने सुरक्षा मागितली. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्या इंडस्ट्रीला तुम्ही बदनाम करताय, ही घाण आहे, असे म्हणत उर्मिलाने कंगनावर मते मांडली.



पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार अभिनेते रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केले होते. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे वाढते प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली होती. सरकारने ड्रग्जचे सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केलं. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुक केलं होतं. यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत 'बॉलिवूडला बदनाम' केले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी कुणाचंही नाव न घेता काही लोकांनी मनोरंजन क्षेत्राला बदनाम केले जात असल्याचेही म्हंटले. यावर अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@