'शरद पवारांना दिल्लीत हाणले होते त्याचेही समर्थन करा'

    दिनांक  13-Sep-2020 17:25:37
|

bjp mla atul bhatkhalkar_मुंबई :
मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच असं  म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सणसणीत टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओला काळाची गरज असं कॅप्शन दिल्याने नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचे राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन केलंय का? असा प्रश्न निर्माण झाला.


अतुल भातखळकर म्हणाले की, मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा आता अशा शब्दात त्यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे. आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओत बाळासाहेब म्हणतात की, कारण नसताना कोणी कानफाडात मारली तर छान मारली, आणखी जोरात मारायला हवी होती, इतका बुळचटपणा बरा नाही, त्याचा फाटकन आवाज आल्यानंतर ताडकन् आपला आवाज आला पाहिजे तो शिवसैनिक...नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी तो तयार ठेवा असे शिवसेनाप्रमुख कार्यकर्त्यांना सांगताना २६ सेकंदचा व्हिडीओ होता. त्यामुळे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन केलं जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी हे ट्विट डिलीट केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.