रियाचा मुक्काम कोठडीतच : जामीन अर्ज फेटाळला

    11-Sep-2020
Total Views |
Reha chakraboprty_1 
 

 
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत अटक झाल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचा जामीन फेटाळला आहे. मुंबईत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय राखीव ठेवला होता.
न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळल्यानंतर रिया महानगर दंडाधिकारी न्यायालयात गेली होती.
 
 
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोतर्फे (एनसीबी) रियाला ८ सप्टेंबर रोजी अटक झाली होती. त्यानंतर सक्तवसुली संचलनालय (ईडी) या प्रकरणी एक नवीन खटला दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जर ड्रग्ज प्रकरणी रिया दोषी सिद्ध झाली तर तिला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
 
  
एनसीबीने चौकशीत आरोप कबूल करण्यासाठी दबाव ठेवला होता. रियाच्या चौकशीवेळी कुणीही महिला उपस्थित नव्हती. रियाच्या अटकेची गरज नव्हती. तिच्या स्वातंत्र्यावर मनमानीप्रमाणे गदा आणण्यात आली. तसेच तिला या प्रकरणात गोवण्यात येत आहे, असे मुद्दे रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयासमोर ठेवले आहेत. तर दुसरीकडे एनसीबीनेही लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. रियाच्या चौकशीत संपूर्ण प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आहे. रियाविरोधात इलेक्ट्रोनिक्स पुरावे आहेत. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अनेकांनी रियाविरोधात साक्ष दिली आहे.
 
  
या प्रकरणात जब्त करण्यात आलेल्या ड्रग्जची मात्रा कमी असली तरीही किंमत १ लाख ८५ हजार २०० रुपये इतकी आहे. ईडी ड्रग्ज प्रकरणात पैशांच्या व्यवहाराची चौकशी करू शकतात. ड्रग्ज प्रकरणात मनी लाँन्ड्रींग चौकशी केली जाणार आहे. ईडी ऑफिसरच्या मते, नवीन खटला दाखल करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. यापूर्वी सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी केलेल्या तक्रारीनुसार, बँकेतून पैसे काढण्याचीही तक्रार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121