'हे कार्यालय महिलेच्या धैर्य आणि साहसाचे प्रतिक'

    दिनांक  11-Sep-2020 12:04:57
|

kangna office_1 &nbsमुंबई
: सध्या कंगना रानौत आणि शिवसेना या वादाची चर्चा आहे. शिवसेनेशी पंगा घेणा-या कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयाचा काही भागावर मुंबई पालिकेने हातोडा चालवला आणि कंगना संतापली.यानंतरही कंगनाचे ठाकरे सरकारविरोधातील ट्विटरयुद्ध सुरुच आहे. काल कंगनाने तिच्या उध्वस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर एक ट्विट केले. मी या उध्वस्त झालेल्या कार्यालयात अशाच परिस्थितीत काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभे राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल, असे कंगना या ट्विटमध्ये म्हणाली. कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचे कौतुक केले आहे.कंगना ट्विटमध्ये म्हणते की,'१५ जानेवारीला मी माझ्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर कोरोनाच्या महामारीने सगळे काही ठप्प झाले़ अनेकांप्रमाणे या दिवसात माझ्याकडेही काम नव्हते. त्यामुळे सध्या या कार्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी अशाच परिस्थितीत येथे काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभ राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल,’ असे कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली.


मुंबई महापालिकेने तोडफोड केल्यानंतर कंगना रानौत काल आपल्या ऑफिसची अवस्था पाहायला गेली. पालिकेने कारवाई केली त्यावेळी कंगना मुंबईत नव्हती. ती मुंबईत येण्याआधीच मुंबई पालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई करायला सुरुवात केली होती. या कारवाईत कंगनाच्या ऑफिसमधील काही वस्तू आणि पेंटिंग्सची देखील तोडफोड झाली आहे. आपल्या ऑफिसची ही अवस्था पाहून कंगना निराश झाली. तिच्या चेह-यावरचे हे निराशेचे भाव दाखवणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कंगनाचे हे ऑफिस याच वर्षात जानेवारीमध्ये तयार झाले होते. याची किंमत ४८ कोटींपेक्षाही अधिक आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.