आता आवाजावरून केली जाणार कोरोना चाचणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |
Corona_1  H x W

मुंबईत होणार नवा प्रयोग

मुंबई : कोरोना आजार जसा जसा जुना होत जात आहे, तसतसे त्याच्या चाचणीच्या नवा पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आता केवळ आवाजावरून कोरोनाचाचणी करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.


मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ चालूच आहे. रुग्णदुपटीचा कालावधी वाढला, रुग्णवाढीचा अॅव्हरेजही कमी कमी होत आला. मात्र रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अजूनही एक हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पालिका जास्तीत जास्त आणि वेगवेगळ्या चाचणीपद्धतींचा अवलंब करताना दिसत आहे.


कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला स्वॅब चाचणी करण्यात येत होती. त्यानंतर अँटीबॉडी पद्धत, त्यापुढेही एक पाऊल टाकत अँटीजन चाचणी करण्यात येत होत्या. मात्र आता जास्तीत जास्त चाचण्या करता याव्यात म्हणून आवाजावर कोरोना चाचणीचा नवा प्रयोग मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे करण्यात येणार आहे.


नेस्कोच्या कोरोना जंबो केअर सेंटरमधील संशयित आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या आवाजाची तपासणी पुढच्या आठवड्यापासून सुरू केली जाईल, असेही पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आवाजाच्या चाचणीमुळे केवळ ३० मिनिटात कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान होणार आहे.


आवाजाच्या चाचणी पद्धतीत ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसतात तेव्हा त्यांना श्वासनाचा त्रास होऊ लागतो. फुफ्फुसांच्या स्नायूंवरही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्यामुळे आवाजावर परिणाम होतो. त्यामुळे बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही हे स्पष्ट होते, असे पालिकेने सांगितले.

कपूर रुग्णालयाच्या सहकार्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून १००० व्यक्तींवर अभ्यास केला जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिने लागतील, असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.


@@AUTHORINFO_V1@@