केशवसृष्टी वनौषधीचा ‘आयुष काढा’

    24-Aug-2020
Total Views | 135


Ayush Ministry_1 &nb

 


आपली प्रतिकारशक्ती वाढवा आणि कोरोना व इतर व्याधींचा सामना करा!


जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची विविध लक्षणे आता आपणा सर्वांस माहीत झाली आहेत. डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, स्नायूंचे दुखणे, ताप, थकवा येणे, घसा खवखवणे, चव न कळणे, वास न येणे, पोटात मळमळणे, अशी प्राथमिक लक्षणे दिसताच सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या भयाने गांगरुन जातो. परंतु, ही लक्षणे इतर साध्या आजारांचीसुद्धा असू शकतात आणि त्यावर वेळेवर घरगुती उपचार केल्यास तीन-चार दिवसांत पूर्ण आराम मिळू शकतो. कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांनाच जर आपण योग्यवेळी आटोक्यात आणले, तर पुढील संकट नक्कीच टाळले जाईल. कोरोनाची लस येईपर्यंत रोगप्रतिकारशक्तीच्या बळावर आपले, आपल्या कुटुंबीयांचे आणि संपर्कात येणाऱ्या समाज बांधवांचे रक्षण करणे हा एकच उपाय आपणा सर्वांच्या हातात आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर, सॅनिटायझेशन आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत राहणे हे आपले कर्तव्य आहे. याचसाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुष काढ्याचा फॉर्म्युला तयार करुन त्याप्रमाणे देशातील आयुर्वेदिक कंपन्यांना उत्पादन करण्याची सूचना केली. त्यानुसार केशवसृष्टी येथील उत्तन वनौषधी संशोधन संस्थेने महाराष्ट्राच्या ‘एफडीए’ची परवानगी घेऊन मे- २०२० पासून आयुष काढ्याचे उत्पादन सुरू केले आहे. आयुष काढ्याचे उत्पादन हे केशवसृष्टी वनौषधीच्या भाईंदर येथील आयुर्वेदिक कारखान्यात केले जात असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘एफडीए’ची मान्यता घेण्यात आली आहे.

 

काय आहे या काढ्यात?

 

तुळस : तुळस ही अशी अद्भुत वनस्पती आहे की, जिच्या दर्शनाने व सहवासाने आपण प्रसन्न होतो. तुळशीचे नियमित सेवन सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे आणि किडनीचे विकार यावर लाभदायक आहे. तुळस ही कृमीनाशक व वेदनाशामक आहे.

 

दालचिनी : दालचिनी ही पचनविकार, सर्दी, कफनाशक, स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार इत्यादी अनेक रोगांवर उपयोगी आहे. दालचिनी ही स्वाद वाढविणारी असून ही शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित करते.

 

काळीमिरी आणि सुंठ यांच्यासोबत दालचिनी घेतल्याने जळजळ, पोटाचे विकार, अपचन, उलटी, जुलाब, जीव कासावीस होणे, गळ्याचे विकार, सूज व मलेरिया कमी होण्यास मदत होते.

 

सुंठ : सुंठीला आयुर्वेदात ‘महाऔषधी’ असे म्हटले आहे. अन्नपचन, पोटात वायू धरणे, कफ, हातपाय दुखणे इत्यादीवर सुंठ अत्यंत गुणकारी आहे.

 

काळीमिरी : हिरड्यांचे दुखणे, पोटातील वायू, पोटात जंत होणे, अपचन, खोकला, सर्दी याबाबतीत काळीमिरी फार उपयोगी आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅण्टिऑक्सिडेंट तत्त्वंदेखील आहे. यामुळे तणाव (टेन्शन) आणि औदासिन्य (डिप्रेशन) दूर होते. स्मरणशक्ती वाढविण्यासदेखील काळीमिरी उपयुक्त आहे.

 

अशी गुणकारी सामग्री योग्य प्रमाणात एकत्र करुन केशवसृष्टी वनौषधीने आयुष काढा बनविला आहे. हा ५० ग्रॅम काढा पावडर स्वरुपात प्लास्टिक डब्यात उपलब्ध असून त्याची किंमत रु. ५० आहे. थोड्या दिवसांनी हा काढा गोळ्या स्वरुपात (टॅबलेट) देखील उपलब्ध होणार आहे. याचे नियमित सेवन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आजारी माणसाने दिवसातून दोन वेळा हा काढा १५ दिवस नियमित घ्यावा आणि १५ दिवसांच्या अंतराने दिवसातून एक वेळा सेवन करावा. अन्य लोकांनी हा काढा दिवसांतून एक वेळा महिनाभर घ्यावा व नंतर एका महिन्याने पुन्हा घेण्यास हरकत नाही. पावसाळा व हिवाळा या ऋतूंमध्ये या काढ्याचे नियमित सेवन करण्यास हरकत नाही.

 

याचे सेवन प्रतिव्यक्ती दोन कप पाण्यात ३ ग्रॅम (एक चमचा) काढा हा उकळून त्याचा एक कप करावा. सेवन करताना त्यात गूळ, लिंबू किंवा मनुका टाकून प्यावा. हा काढा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे (इम्युनिटी बुस्टरचे) काम करतो आणि आपल्या शरीरास कोरोना व इतर व्याधींबरोबर लढण्याची ताकद देतो. हा काढा पूर्णपणे आयुर्वेदिक औषधींपासून बनविलेला असल्याने योग्य मात्रेत घेतल्यास अतिशय गुणकारी परिणाम दिसतात. तरीही याबाबतीत वैद्यांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

 

केशवसृष्टी वनौषधी या काढ्याचे उत्पादन आणि वितरण आपणा सर्वांच्या सहयोगाने करुन, कसलाही नफा न घेता जनतेची नि:स्वार्थ सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थेचा उद्देश्य कमीत कमी किमतीत भारतातील प्रत्येक कुटुंबापर्यंत हा काढा पोहोचविणे हा असून या निमित्ताने दर्जेदार आयुर्वेदिक औषधे व उत्पादने लोकांपर्यंत पोहोचतील.

 

केशवसृष्टी वनौषधी आयुष काढा हा समाजातील प्रत्येक व्यक्तींसाठी शक्तिवर्धक आहे.

 

गेल्या तीन महिन्यांत हजारो कुटुंबांनी या काढ्याचे सेवन केले असून त्याचा लाभ घेतला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या परिसरातील खासदार, आमदार, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी तत्परतेने पुढाकार घेऊन हा काढा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठी मदत केली आहे. हे काम अजूनही अनेक भागात चालू असून महाराष्ट्रातील सर्व भागात देण्याचे प्रयत्न होत आहेत.

 

मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, माजी खासदार संजय निरुपम, कांदिवलीचे (पूर्व) आमदार अतुल भातखळकर, बोरिवलीचे आमदार सुनील राणे, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, माजी आमदार अतुल शहा, मुंबई भाजपचे नेते व आ. आशिष शेलार, मालाडचे विनोद शेलार, शिवसेना आमदार मनिषा कायंदे, कांदिवलीचे आमदार योगेश सागर आणि अनेक महानगरपालिका, नगरपालिका यांचे नगरसेवक यांनी आपल्या विभागातील लोकांना हा ‘आयुष काढा’ दिला आहे.

 

अनेक हाऊसिंग सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिटीजनी हा काढा घरोघरी पोहोचविला आहे.

 

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, वांद्रे, माटुंगा, दादर, मुंबई सेंट्रल, गिरगाव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, साकीनाका आदी मुंबईतील अनेक विभागांमध्ये संघ स्वयंसेवकांनी या काढ्याचे महत्त्व व फायदे सांगून त्याचे घरोघरी जाऊन वाटप केले आहे. असेच काम ठाणे, नाशिक व पुणे येथे ही झाले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर हा काढा गुजरातमध्येही पोहोचला आहे.

 

विश्व हिंदू परिषद, मजदूर संघ, विविध सामाजिक संस्था यांच्याद्वारेही या काढ्याचे प्रतिदिन वितरण होत आहे.

 

मीरा-भाईंदरमध्ये कित्येक कार्यकर्ते लोकांपर्यंत हा काढा देण्याचे काम करीत आहेत. अजूनही अनेक नवीन भागात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यामार्फत हा ‘आयुष काढा’ पोहोचविण्याचे ध्येय संस्थेसमोर आहे. संस्थेने असे आवाहन केले आहे की, मेहनती तरुणांनी पुढे येऊन या कामामध्ये सहभागी व्हावे आणि जनतेची सेवा करावी. येणाऱ्या गणेशोत्सव, दसरा, दिवाळी इत्यादी सणांमध्ये विविध प्रसंगी लोकांना तयार काढा पाजणे (देणे) आणि त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून समाजाला व देशाला संकटमुक्त करणे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या!

 

संपर्क - डॉ. श्रृती वारंग, उत्तन वनौषधी संशोधन संस्था, उत्तन गोराई रोड, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर, जिल्हा ठाणे. फोन २८४५०७२०

 

ईमेल - uvss.keshavsrushti@gmail.com

 

मोबाईल संपर्क - डॉ. श्रृती वारंग - ९८३३०४८५१६, सतीश सिन्नरकर - ९८२१०३९७२२, संतोष राजवाडे - ९८६९५२७२३४, आशीष गोखले - ९८९२५५१५५२, दीपक राणा - ७७३८९९९९०४, डॉ. किरण पंडित - ९८२१०९०६९६, राजेंद्र जोशी – ९३२४४८७४४७

 
 

- सतीश सिन्नरकर

(लेखक केशवसृष्टीचे उपाध्यक्ष आहेत.)

 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121