रंजक मर्डर मिस्ट्री घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘देवमाणूस’!

    17-Aug-2020
Total Views | 177
Devmanus_1  H x


‘रात्रीस खेळ चाले २’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका लवकरच झी मराठी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात मध्यवर्ती भूमिकेत ‘लागीर झालं जी’ फेम ‘भैय्यासाहेब’ म्हणजेच किरण गायकवाड असणार आहे.


समाजातील अपप्रवृत्तींविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मालिका सादर करण्यात येत असून मालिकेचे चित्रिकरण साताऱ्यात होत आहे. ३१ ऑगस्टपासून रात्री १०.३० वा. वाजता झी मराठीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेली ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोकणात घडणारी घटना, पाहणाऱ्या प्रत्येकालाच जागी खिळवून ठेवणारी ठरल्याने मालिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. ‘रात्रीस खेळ चाले २’ संपून त्याजागी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने या मालिकेकडून प्रेक्षकांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121