सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला ईडीचा दणका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2020
Total Views |

Reha_1  H x W:



ईडीकडून रिया चक्रवर्तीवर मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत आता अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतली आहे. शुक्रवारी ईडीने पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला. पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर पैसे हडपल्याचा आरोप केला आहे.


यापूर्वी गुरुवारी ईडीने बिहार पोलिसांकडून एफआयआर आणि सुशांतच्या बँक खात्यांचा तपशील घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला. यासंदर्भात फडणवीस यांनी ट्विट केले आहे. 'एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने मनी लाँडरिंगच्या दृष्टीकोनातून त्याचा तपास सुरू करायला हवा', असे ट्विट फडणवीसांनी केले. सीबीआय चौकशीबाबत राज्य सरकारने लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.


सुशांतच्या वडिलांनी त्याच्या बँक खात्यातील १५ कोटी रुपये तीन वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप केला होता. ही खाती रिया, तिचा भाऊ शोविक आणि तिच्या आईच्या नावी आहेत, असे त्यांनी म्हटले होते.. सुशांत आणि रियाने एकाच वेळी तीन स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे. सुशांतला उद्योजक बनायचे होते, त्यासाठी तो गुंतवणूक देखील करत होता. अशीच एक गुंतवणूक त्याने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या नावे असलेल्या कंपनीत केली असल्याची माहिती समोर आली आहे.


भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय, ईडी चौकशीची मागणी केली होती.





@@AUTHORINFO_V1@@