प्रसिद्धीची नशा चढलेल्या कंगनाला मी ओळखत नाही : अनुराग कश्यप

    दिनांक  21-Jul-2020 15:32:39
|

Kangana anurag_1 &nb
अनुराग-कंगनामध्ये ट्विटर वॉर सुरु!; अनुराग ‘मिनी महेश भट्ट’ कंगनाचा आरोप!


मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर नेपोटिझमबाबत वाद सुरू झाले आहेत. प्रत्येकजण बॉलीवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या घराणेशाहीबद्दल बोलत आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने घराणेशाहीला प्रोत्साहन देणाऱ्यांविरूद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. कंगनाने तिच्या एका मुलाखतीत सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडमधील बड्या निर्मात्याला जबाबदार धरले आहे. यानंतर तिने म्हटले आहे की, ‘जर माझे वक्तव्य खोटे ठरले तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन’. आता चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याने या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


अनुराग कश्यप यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कंगनाचा एक जुना मुलाखत शेअर केला. ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर ही मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत पोस्ट करताना अनुराग कश्यप यांनी लिहिले- 'काल मी कंगनाची मुलाखत पाहिली. ती एकेकाळी माझी खूप चांगले मैत्रीण होती. माझ्या प्रत्येक चित्रपटावेळी येऊन मला प्रोत्साहित करायची. पण मला ही नवीन कंगना माहित नाही.’आणखी काही ट्विट करत त्याने असेही म्हंटले की, ‘बॉलीवूडमधील असो वा बाहेरील, प्रसिद्धीची नशा प्रत्येक माणसाला वेड लावते.कंगनाच्या बाबतीतही तेच होत आहे. तिला आरसा न दाखविण्याची चूक करून सगळे तिचे करियर संपवत आहेत.’ अनुराग कश्यपने या वादात उडी घेत कंगनाला ओळ सुनावले आहेत. मात्र यावर गप्प न राहता कंगनानेही त्याला ‘मिनी महेश भट्ट’ संबोधत पलटवार केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.