केरळमध्ये हत्तीणीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक!

    दिनांक  05-Jun-2020 15:32:08
|

Elephant_1  H x


केरळच्या वन विभागाकडून कारवाई; वनमंत्री के. राजू यांनी दिली माहिती


तिरुअनंतपुरम : केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच हत्तीणीला फटाकांनी भरलेले अननस खायला देणाऱ्या आरोपींविरोधातही देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी केरळ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.


भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने मृत्यू झाला होता. या फटाक्यांच्या स्फोटानंतर या हत्तीणीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे हत्तीणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली होती. या अमानवीय घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.एका वन अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टनंतर हा सगळा प्रकार उजेडात आला. या वन अधिकाऱ्यांच्या फेसबूक पोस्टनंतर सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या अटकेची मागणी आता केली जात होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेरीस केरळ सरकारने पावले उचलत पोलीस आणि वन-विभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखले. सरकारी यंत्रणांच्या या प्रयत्नांना अखेरीस यश आले. केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.