सात मंत्रालये आणि ११ बड्या कंपन्यांनीही राजीव गांधी फाऊंडेशला केली मदत !

    दिनांक  26-Jun-2020 16:15:51
|
Gandhi Parivar_1 &nb

एकामागोमाग एक राजीव गांधी फाऊंडेशनला होणाऱ्या दानाचे मोठे खुलासे केले जात आहेत. यात काँग्रेस सरकारच्या गृहमंत्रालयापासून ते अन्य सात मंत्रालयातूनही दान करण्यात आले. इतकेच नव्हे तर ११ मोठ्या सार्वजनिक उपक्रमांचाही सामावेश यात करण्यात आला. 

विशेष म्हणजे खोऱ्याने दान ओढण्याचा हा उपक्रम मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये करण्यात आला. यात महत्वाची भूमीका म्हणजे त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ज्यांची सरकारच्या प्रत्येक निर्णयात महत्वाची भूमीका होती. ज्या प्रकारे चीनी कम्युनिस्ट पक्षाकडून दानाची रक्कम गोळ्या करण्याची बाब उघडकीस आली होती. तशाच प्रकारे मिळेल त्या ठिकाणांहून पैसे गोळा करणे हेच प्रमुख लक्ष्य होते हे दिसून आले. सरकारच्या कित्येक विभागांनी आणि मंत्रालयांनी तसेच सार्वजनिक उपक्रमांनी वर्ष २००५ ते २०१३ पर्यंत या संस्थेमध्ये दान केले. त्या मंत्रालयांची आणि सरकारी विभागांची सूची या ठिकाणी देण्यात आली आहे.


सरकारी विभाग जे राजीव गांधी फाऊंडेशनला दान करत


गृह मंत्रालय (2005-06, 2006-07, 2007-08, 2008-09)

प्रौढ शिक्षण निर्देशालय, मानव संसाधन मंत्रालय (2005-06, 2006-07, 2007-08, 2008-09)

आरोग्य आणि परीवार कल्याण मंत्रालय (2005-06, 2006-07, 2007-08, 2008-09)

पर्यावरण आणि वन मंत्रालय (2005-06, 2006-07, 2007-08, 2008-09)

लघु उद्योग मंत्रालय (2007-08, 2008-09)

राष्ट्रीय स्वरोजगार मिशन, ग्रामीण विकास मंत्रालयाची एक परियोजना (2008-09, 2010-11)

महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सबला (2011-12, 2012-13)

LIC (2005-06)

सेल (2005-06)

गेल (इंडिया) लिमिटेड (2005-06, 2006-07, 2007-08, 2008-09, 2009-11, 2010-11, 2011-12, 2012-13)

ऑयल इंडिया लिमिटेड (2005-06, 2006-07)

ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स (2005-06)

SBI (2005-06, 2006-07, 2007-08, 2008-09, 2010-11, 2011-12, 2012-13)

बैंक ऑफ महाराष्ट्र (2006-07, 2007-08, 2008-09, 2009-11)

आवास और शहरी विकास निगम लिमिटेड (HUDCO) (2006-07)

ONGC (2006-07, 2007-08, 2008-09, 2009-11, 2010-11, 2011-12, 2012-13)

आईडीबीआई बैंक (2006-07)

भारतीय इस्पात प्राधिकरण लिमिटेड (2007-08, 2008-09, 2009-11, 2010-11, 2011-12, 2012-13)

उल्लेखनीय म्हणजे राजीव गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. राहुल गांधी. प्रियांका वाड्रा, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आदी वरीष्ठ नेतेही या संस्थेचे सदस्य होते. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसला घेरले आहे. एका परीवाराने संपूर्ण देशातील जनतेचा पैसा अशाप्रकारे लुटला असा आरोप त्यांनी केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.