महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथिल करू नका ! : जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020
Total Views |
WHO _1  H x W:






जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा दिला सल्ला आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन उठवू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन उठेल याची शक्यता सध्यातरी धुसर दिसत आहे.


जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ३८ हजारहून अधिक आहे तर मृतांचा आकडा ४ हजारहून अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, जास्त प्रभावित असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यास अधिक गंभीर परिस्थितीत होऊ शकते. तसंच अजून बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, चंदीगढ आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यास मनाई केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@