आयपीएल २०२० आता अनिश्चित काळासाठी पुढे ?

    14-Apr-2020
Total Views | 39

ipl_1  H x W: 0
 
 
मुंबई : कोरोणाचा प्रादुर्भाव आणि भारतामध्ये लॉकडाऊन यामुळे मार्च महिन्यामध्ये होणारी आयपीएल २०२० ही स्पर्धा जून ते सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात यावी, अशी चर्चा चाललेली होती. मात्र, यावर आयपीएल रद्द होण्याचे संकेत याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेदेखील दिले होते. तर आता बीसीसीआयच्या सूत्रांनुसार आयपीएलची या हंगामामधील स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता अधिकृत घोषणा काय आणि कधी होणार याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
 
 
एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवल्यामुळे यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात बीसीसीआय अधिक पर्यायांवर विचार करणार असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी खेळवली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121