अडचणीच्या काळात रा. स्व संघ स्वयंसेवकांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय

    दिनांक  25-Mar-2020 13:52:19
|


rss nashik_1  Hनाशिक : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू झाली. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहाराच्या सीमेवर आडगाव ट्रक टर्मिनल आणि विल्होळी ट्रक टर्मिनल, पुणे ट्रक टर्मिनल येथे साधारण ५५० ट्रक हे चालक आणि सहाय्यक यासोबत अडकलेले आहेत.यात सर्व ट्रक चालक आणि सहाय्यक यांना सिडको
, इंदिरानगर, नासिक रोड या भागातील १००० घरातून डबे गोळा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मार्फत ११५० पोळीभाजी, लोणचे आणि चटणी या स्वरूपातील डब्यांचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटना यांच्या माध्यमातून करण्यात आले. काही चौकात पोलिसांना सुध्दा या डब्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात भोसला
, सातपूर, जुने नाशिक पंचवटी, आडगाव म्हसरूळ आदी भागातून डबे गोळा करण्यात येत आहे. ज्या घरातून डबा देण्यात आला व देण्यात येणार आहे त्या सर्व माऊलींचे खूप खूप अभिनंदन व त्यांना शतशः प्रणाम. असे म्हणत जनकल्याण समितीचे जिल्हा निधी प्रमुख अनिल चांदवडकर यांनी आभार मानले आहेत. या कार्यात संघ स्वयंसेवक अनिल चांदवडकर, अमोल जोशी यांच्या सह अनेक स्वयंसेवक व जिल्हा ट्रांसपोर्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष स्वयंसेवक राजेंद्र नाना फड व मार्गदर्शक सुभाष शेठ जांगडा व असोसिएशनचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभाविप कडून महाराष्ट्रात रक्तदानास सुरुवात


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत आहे यामुळे महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे या कारणाने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्या उद्देशाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी केले आहे. तसेच संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढी जाउन स्वतः तह रक्तदान करून या रक्तदानाच्या मोहिमे ची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी नागरिकांनी नागरिक आपापल्या ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.