रुग्णमदतीसाठी धडपडणारा रामभाऊ

    दिनांक  09-Dec-2020 16:38:34
|

rambhau patkar_1 &nbसरकारने पुनश्च ‘हरिओम’ म्हणत, ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले असले, तरी ‘लॉकडाऊन’चा भयावह प्रवास अजून संपलेला नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडील आरोग्य यंत्रणा खूप तोकडी असल्याचा अनुभव सध्या येत आहे. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी धडपड करण्याचे काम भाजपचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर (रामभाऊ) पातकर यांनी केले आहे. त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा.

नंदकिशोर गोपाळ पातकर
राजकीय पक्ष : भाजप
मतदारसंघ : मुरबाड मतदारसंघ, भिवंडी लोकसभा
पद : माजी नगराध्यक्ष
संपर्क क्र. : ८८०५१७३८८८


रामभाऊ पातकर यांनी मुंबईतील काही मित्रांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांना आवश्यक असणार्‍या साहित्यांचा पुरवठा केला होता. त्यामध्ये ‘पीपीई’ किट, मास्क, सॅनिटायझर, बेड, उश्या, चादर, ऑक्सिमीटर, व्हेटिंलेटर, गरम पाण्याचे भांडे, अशा विविध वस्तूंचा समावेश होता. ठाणे जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालय, कल्याण, कुळगाव- बदलापूर नगरपालिका, उल्हासनगरचे सेंट्रल रुग्णालय व टिटवाळा गणपती मंदिर ट्रस्ट, विठ्ठल मंदिर, टिटवाळा रेडक्रॉस रुग्णालय, ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय, अशा १७ ते १८ रुग्णालयांना या साहित्याचे वाटप केले आहे. ‘कोविड रुग्णां’ची फक्त काळजी न करता, पातकर यांनी इतरांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिताही मोठ्या प्रमाणावर काम केले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना ‘पीपीई’ किटचे वाटप केले. पातकर यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी दहा हजार लोकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. ‘आर्सोनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधाचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले. बदलापूर, शहापूर, मुरबाड, भिंवडी, कल्याण, उल्हासनगर, टिटवाळा या भागातील सुमारे एक लाख कुटुंबांना या गोळ्यांचे वाटप केले.

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचा रोजगार गेला. काही नागरिकांच्या वेतनात कपात झाली. त्यामुळे अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मध्यमवर्गाला तर धड कुणाकडे मदत मागता येत नव्हती आणि रोजगार नसल्याने दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले होते. ही गोष्ट पातकर यांच्या लक्षात आली. पातकर यांनी अशा मध्यमवर्गीय कुटुंंबांचा शोध घेतला. या कुटुंबांना त्यांनी स्वत:हून अन्नधान्य पुरविले. ही कुटुंबे मध्यमवर्गीय सोसायटीत राहणारी आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळात बूट पॉलिशवाल्याचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. पातकर यांना वांगणी येथील प्रादेशिक कार्यालयातून फोन आला होता. या बूट पॉलिशवाल्यांना अन्नधान्य वाटप करावे, असे सांगितले. त्यावर पातकर यांनी, सर्व रेल्वे स्टेशनवरील सुमारे ८० ते ९० बूट पॉलिशवाल्यांना अन्नधान्य वाटप केले. सुमारे १२५ नेपाळी लोकांनाही अन्नधान्य वाटप केले.नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी पातकर यांनी जनजागृतीही केली. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करतात. पण, पातकर यांनी प्रत्यक्ष ‘फिल्डवर्क’वर भर दिला. प्रत्येक सोसायटीत जाऊन मास्क व सॅनिटायझरचे वाटप करीत त्यांच्यामध्ये जनजागृती केली. हे काम करताना पातकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रतीही जात होत्या. त्यांनीही सोसायटीत जाऊन मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, हे लोकांना समजावून सांगितले. खासगी रुग्णालयांकडून ‘कोविड’ रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात होती. या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात होती. ही बिले कमी करण्यासाठी पातकर यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना किरीट सोमय्या यांनीही मदत केली. 


rambhau patkar_1 &nb


मी जे सामाजिक काम केले, त्यामुळे लोकांना आनंद झाला. महेश पांडे, हे एक ‘कोविड’ रुग्ण होते. त्यांनी, “आपल्याला दुसरा जन्म मिळाला,” अशी प्रतिक्रिया दिली. नागरिकांच्या चेहर्‍यावरचा हा आनंदच आम्हाला महत्त्वाचा आहे. आपण समाजाचे देणे लागतो, हे प्रत्येक नागरिकाने समजून इतरांना मदत केली पाहिजे. मी मध्यमवर्गीयांना शोधले आणि त्यांना मदत केली आणि मध्यमवर्गीयांनी ती मदत स्वीकारली.समाजातील गरजू आणि ‘कोविड’ रुग्णांना मदत करण्यासाठी पातकर सातत्याने घराबाहेर राहत होते. एवढे सगळे काम उभे करताना त्यांचाही संपर्क इतरांशी आला. पातकर घराबाहेर फिरताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत असत. पण, तरीही त्यांना ‘कोविड’ची लागण झाली. त्यावर योग्य उपचार घेऊन कोरोनाला हरवून पातकर १५ दिवसांनी घरी परतले. घरी परतल्यावरही त्यांनी स्वत:ची पूर्ण काळजी घेतली. पातकर यांची ‘कोविड’ चाचणी सकारात्मक आल्यावर त्यांना आपल्या कुटुंबाचीही धास्ती वाटू लागली होती. पण, सुदैवाने कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती. पातकर यांना ही बातमी समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पातकर यांनी योग्य उपचार, पोषक आहार आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन, यामुळे या रोगावर मात केली. या सर्व कामात पातकर यांना कुटुंबीयांची मोठी साथ लाभली. पातकर यांच्या पत्नी रती यांनीदेखील त्यांच्या बरोबरीने या कामात मदत केली. रती यांच्या काही महिला कार्यकर्त्याही या कामात सहभागी झाल्या. या कामात कार्यकर्त्यांची मोठी साथ लाभली. त्यात जयेश नाचणे, आशू त्रिवेदी, देवेंद्र राठोड, अविनाश हांडे, अभी हांडे, डॉ. दिनेश गुजर, योगेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मयंक पोतदार, नरेंद्र पोतदार, भारत मर्चंड चेंबर, रोटरी क्लब मुंबई, रोटरी क्लब साऊथ, अग्रवाल समाज यांची मोलाची साथ या कामाला लाभली. या सर्व संस्था आणि पातकर या सर्वांनी मिळून दोन कोटींच्या आसपास खर्च केला. पातकर कामासाठी घराबाहेर पडत होते. त्यामुळे अनेक जण त्यांना ‘घराबाहेर का पडता?’ असे विचारायचे. पण, पातकर यांनी आपले काम सुरू ठेवले होते. पातकर यांचा जवळचा मित्र सतीश ओक यांचे कोरोनामध्ये निधन झाले. हा पातकर यांना एक धक्काच होता. आताही रुग्णांना बेड मिळवून देणे, बिल कमी करून देणे, ही कामे अजूनही सुरू आहेत.मध्यमवर्गीय लोकांना बोलता येत नाही. बँकेचे हफ्ते भरताना त्यांना नाकीनऊ आले होते. रोजगार गेला होता. एका ९० वर्षांच्या आजोबांना मदत केली. ज्यांची मुले परदेशात गेली त्यांच्या आईवडिलांना मदत केली. हे सर्वच क्षण भावनिक होते.


-जान्हवी मोर्ये
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.