'आयटी रिर्टन' भरण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

    दिनांक  30-Dec-2020 22:41:19
|
ITR_1  H x W: 0

नवी दिल्ली : आयकर विवरणासाठीची (आयटीआर रिटर्न) मुदत पुन्हा एकदा वाढवत केंद्र सरकारने करदात्यांना बुधवार, दि. ३० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने ‘आयटीआर रिटर्न’ भरण्याची मुदत दहा दिवस वाढवली आहे. आता करदात्यांना दि. १० जानेवारी, २०२१ पर्यंत ‘आयटीआर रिटर्न’ भरता येईल. दरवर्षी दि. ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे दोन वेळा मुदत वाढवण्यात आली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.