लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे प्रतिबंध !

    17-Nov-2020
Total Views | 83

Laxmi Vilas_1  
 


२५ हजारांचीच रक्कम काढता येणार


नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयने १६ डिसेंबरपर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खातेधारकांना आता २५ हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. वित्त मंत्रालयातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी पंजाब महाराष्ट्र कॉ ओपरेटीव्ह बँकेवर ही कारवाई केली आहे.
 
 
 
बीआर अॅक्ट ४५ अंतर्गत आरबीआयच्या विनंतीनंतर मोराटोरिअम लावण्यात आला आहे. मोराटोरियम लागू झाल्यानंतर २५ हजारपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार करता येणार नाही. त्यापेक्षा अधिक व्यवहार करण्यासाठी बँक ग्राहकाला रिझर्व्ह बँकेला विनंती करावी लागणार आहे.
 
 
 
लक्ष्मी विलास बँकेच्या अडचणी २०१९ मध्ये सुरू झाल्या. रिझर्व्ह बँकेने इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्ससह मर्जरच्या प्रस्तावाला खारीज केले होते. सप्टेंबरमध्ये भागधारकांतर्फे सात संचालकांविरोधात मदतान झाल्यानंतर संकटात अडकलेल्या या बँकेला चालवण्यासाठी मीता माखन यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांची समिती तयार केली होती.
 



 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंचा युतीबद्दल

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121