नसीरुद्दीन शाह यांच्या मुलीविरोधात पोलीसांत तक्रार

    दिनांक  25-Jan-2020 16:17:26
naseeruddin shah_1 &
 


मुंबई : नसीरुद्दीन शाह यांच्या मुलीविरोधआत यांच्याविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका प्राण्यांच्या उपचार केंद्रामध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. हिबा शाह यांनी १६ जानेवारीला या केंद्रात जाऊन महिलांना मारहाण केल्याचे उघड झाले आहे. तर हिबा हिने महिलांनीच आपल्याला मारहाण केल्याचा प्रत्यारोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही छायाचित्रण व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.

 

फेलाइन फाऊंडेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिबा या दोन मांजरींच्या नसबंदी शस्त्रक्रीयेसाठी या क्लिनिकमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, काहीकारणास्तव नसबंदी होऊ शकली नाही. याच कारणामुळे हिबा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. बाचाबाचीचे मारहाणीत रुपांतर झाले. हिबा यांनी महिला कर्मचाऱ्यांशी झटापटी सुरू केली.

 

दरम्यान, या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी हिबा विरोधात कलम ३२३, ५०४ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिबा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 'मला मारहाण करण्यात आली होती, त्यामुळे मी प्रतिक्रार केला मला आत जाऊ दिले नाही, तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला धक्काबुक्की केली.', असे त्यांनी सांगितले आहे.

 

हिबा यांचे वडिल नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरून काही दिवसांपूर्वी गदारोळ उठला होता. अनुपम खेर यांच्यावर टीका करत ते जास्त बोलत असतात, त्यांच्या वक्तव्याला मी गंभीरपणे घेत नाही, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकाराला अनुपम खेर यांनीही प्रत्युत्तर दिले होते.