योगेश सोमण यांच्या समर्थनात विद्यार्थांची एकजूट

    दिनांक  14-Jan-2020 11:54:08   
|


yogesh_1  H x Wस्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा घेतला होता समाचार


मुंबई
: मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् विभागातून योगेश सोमण यांना संचालकपदावरून हटवण्याच्या मागणीविरोधात आता योगेश सोमण यांना पाठींबा देण्यासंदर्भात एकमुखाने विद्यार्थांनी आवाज उठवला आहे. तसेच आंदोलनकर्त्यांचा विशिष्ट गट हेतूपुरस्पर हे प्रकरण चिघळवत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. १३ जानेवारीला रात्री १२ वाजता आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांनुसार त्याची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे रजिस्टार अनिल देशमुख आणि परीक्षा नियंत्रक विनोद पाटिल यांनी लेखी आश्वासन आंदोलनकर्त्या विदयार्थ्यांना देण्यात आले.


तसेच संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याचे जाहीर केले. विद्यापीठ याबाबत चौकशी समिती नेमणार असून पुढील कारवाईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील
, तसेच नवीन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या इतर सर्व अडचणी तात्काळ आठवड्याभरात पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलक विद्यार्थ्यांना देण्यात आले. परंतु काही विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी योगेश सोमण यांच्या समर्थनात कुलपतींकडे पत्र लिहून पाठींबा दर्शवला आहे. तर यासर्व प्रकारावर यापूर्वीच संचालक योगेश सोमण यांनी स्पष्ट केले होते कि, विद्यापीठ स्तरावरील कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे.

 


मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागात गेल्या काही दिवसांपासून काही विद्यार्थ्यांच्या गटाने आपल्या मागण्यांसाठी नाट्यमय आंदोलन सुरू केले. यात प्रामुख्याने योगेश सोमण यांच्या विरोधात कुलपतींनी कारवाई करावी
, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने अद्याप यात कुठलाही निर्णय दिला नसून आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, संचालक योगेश सोमण यांच्या निलंबनाची मागणी लावून धरत आम्ही आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला कळवले.या मागणीसह लवकरात लवकर शिक्षकांची नेमणूक करावी
, तसेच गतवर्षीच्या सत्रातील सहा महिन्यांचा कालावधीही नुकसान भरपाई म्हणून द्यावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. दिशा विद्यार्थी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, छात्र भारती, एन एस यु आय आदी प्रमुख डाव्या संघटनांनी या विद्यार्थ्यांना पाठींबा दर्शवला होता. या संघटनांच्या पाठींब्यामुळे आंदोलनाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे. मात्र, मोठा गट हा याचवेळी योगेश सोमण यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे चित्र विद्यापीठाच्या आवारात दिसून आले. योगेश सोमण यांना हटवण्याच्या बातमीला केवळ राजकीय रंग देण्याचे काम या माध्यमातून केले गेले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

 आंदोलन करणारे वर्गात दिसलेच नाही !


योगेश सोमण यांना समर्थन करणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मते
, "आंदोलनकर्ते हे वर्गात कमी आणि अशा आंदोलनांमध्येच जास्त दिसतात. याच विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार, विद्यापीठ प्रशासनाने अधिक तासिकाही सुरू केल्या होत्या. मात्र, या तासिकांनाही त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही. त्यांच्याच मागणीनुसार, योगेश सोमण यांनी नव्या थिएटरची निर्मिती विभागात केली होती. सोमण विद्यार्थ्यांसाठी कधीही उपलब्ध असतात. मग नेमके हे आंदोलन कशासाठी आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
आंदोलनाला 'राजकीय' वास

योगेश सोमण हे त्यांचे वैयक्तिक मत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी परखडपणे मांडतात. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा सोमण यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यांना विरोध करण्यामागे हेच कारण असल्याचा आरोपही समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी राजकीय संघटनांकडून पाठींबा मिळत असल्याचीही चर्चा विद्यापीठात आहे.

आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

 

मोजक्या चौकडीच्या अट्टाहासापायी इतरांचे नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. या मागण्यांमुळे शिकवण्यास अडसर येत आहेत. मात्र, वातावरणही दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.