शेफाली वैद्य आणि स्वरा भास्कर यांच्यात रंगले ट्विटर युद्ध

    दिनांक  31-May-2019


स्वरा भास्कर ही अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे तर प्रसिद्ध आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त वादग्रस्त विधानांमुळे ती जास्त चर्चित असते. दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर निवडणुकीत 'महा पनौती' हा पुरस्कार कोण जिंकेल असा प्रश्न पुण्यातील सुप्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

 
 
 

ट्विटरवरून एका पोलच्या माध्यमातून शेफाली यांनी लोकांना या प्रश्नावर आपले मत देण्याचे आवाहन केले. यामध्ये तीन पर्याय देण्यात आले होते. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन, ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त आणि कायम वादाच्या भवऱ्यात अडकणारी स्वरा भास्कर. या स्पर्धेत स्वरा भास्कर विजयी झाली आहे. या विजयाचे अभिनंदन करत शेफाली वैद्य यांनी स्वराला उद्देशून हे ट्विट केले.

 
  
 

त्यावर स्वराने देखील शेफाली वैद्य यांना प्रत्युत्तरादाखल ट्विट केले. अखेर हे ट्विटर युद्ध संपले खरे मात्र स्वरा भास्कर अजून किती दिवस आपले असे हसे करून घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. 

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat