शिवरायांच्या आयुष्यात ‘८’ चा असाही योगायोग
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला घेतले की प्रत्येकवेळी त्यातून नवीन काहीतरी हाताला गवसते. शिवचरित्रातील विविध प्रसंग, घटना यांचा अभ्यास करताना सापडणारं हे नवं काहीतरी अगोदर वाचलेल्यापेक्षा किती वेगळं असतं याचा अनुभव वाचकांना येत असेल. नित्य नवे भासे असं जे शिवचरित्राचे वर्णन करतात ते उगाच नव्हे. त्यात शिवचरित्रातील दुर्लक्षित पैलु म्हणावा की, केवळ एक विलक्षण योगायोग असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात ‘८’ या अंकाकडे पाहतांना .... पाहूया हा विलक्षण योगायोग.
१) छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे आठवे अपत्य आहेत.
२) शिवाजी महाराजांचा जन्म १९/२/१६३० रोजी आणि त्यांचे निधन ३/४/१६८० रोजी झाले.
(महाराजांच्या आयुष्याचा गुणांक = १+९+२+१+६+३+०+३+४+१+६+८+० = ४४ = ४+४ = आठ)
३) शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील एक आदर्श राजे होते. (१+७ = आठ)
४) शिवरायांना आठ पत्नी होत्या.
सईबाई निंबाळकर, सगुणाबाई शिर्के, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, लक्ष्मीबाई विचारे,सकवारबाई गायकवाड,काशीबाई जाधवराव, गुणवंताबाई इंगळे.
(शिवरायांच्या ८ पत्नी, ६ मुली व २ मुलांविषयी संपुर्ण माहिती)
५) शिवरायांना आठ अपत्ये होती.
संभाजी महाराज,राजाराम महाराज, सखुबाई निंबाळकर, राणुबाई जाधवराव,अंबिकाबाई महाडिक,राजकुंवरबाई शिर्के, दिपाबाई विसाजीराव, कमळाबाई पालकर.
६) छत्रपती शिवरायांना आठ शत्रू होते.
मोगलशाही,आदिलशाही,निजामशाही,कुतुबशाही,इंग्रज,पोर्तुगीज,सिद्दी आणि स्वकीय.
७) छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.
पेशवा किंवा मुख्य प्रधान, मुजुमदार किंवा अमात्य,सचिव किंवा सुरनिस,वाकनिस किंवा मंत्री, सेनापती किंवा सरनौबत,पंडितराव किंवा राजपुरोहित, न्यायाधीश, डबीर किंवा सुमंत.
(छत्रपती शिवरायांच्या प्रशासनाची ८ वैशिष्ट्ये अवश्य वाचा.)
८) छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा अष्टकोनी होती. राजमुद्रेत बत्तीस अक्षरे असून प्रत्येक शब्द आठ अक्षरांच्या पटीत आहेत.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोःशिवस्यैषा मुद्राभद्रायराजते.
९) शिवरायांनी १६४५ मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यांचे निधन १६८० मध्ये झाले. त्यांची एकूण कारकीर्द ३५ वर्षांची आहे. (३+५= आठ)
१०) शिवरायांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला त्यावेळी त्यांचे वय ४४ वर्ष होते. (४+४= आठ)
११) शिवाजी महाराजांची उंची ही १७० सें.मी. होती. (१+७ = आठ)
१२) शिवरायांच्या पट्टराणी महाराणी सईबाईंचे निधन ५/९/१६५९ रोजी झाले.
(५+९+१+६+५+९ = ३५ = ३+५ = आठ)
१३) छत्रपती शिवरायांची रायगडवरील समाधी अष्टकोनी आकाराची आहे.
१४) छत्रपती शिवरायांचे वैशिष्टय सांगतांना महाराजांना अष्टावधानी म्हटले गेले आहे.