नंदुरबारला हिंदू राष्ट्र सभेनिमित्त मोटारसायकल रॅली

    08-Dec-2018
Total Views | 18

 
नंदुरबार :
 
‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात, पारंपारिक पोशाखात हिंदू जनजागृती समितीच्यावतीने भव्य शिस्तबद्ध मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
 
या मोटारसायकल रॅलीत शहरासह आजूबाजूच्या खेड्यांमधून 125 दुचाकीस्वार धर्माभिमानी सहभागी झाले होते. ‘संपूर्ण नंदुरबार शहराला 9 डिसेंबर या दिवशी आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे निमंत्रण देणे’, हा या फेरीमागील उद्देश होता.
 
दुपारी ठिक 3 वाजता धर्मप्रेमी श्रेयस पिसोळकर यांनी केलेल्या शंखनादाने वाहनफेरीला प्रारंभ झाला. एम.डी.टी.व्हीचे संचालक धर्मेंद्र पाटील यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. रोकडेश्वर व्यायामशाळेचे अध्यक्ष बाला चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. ग्यारा मिल कंपाऊंड येथून प्रारंभ होऊन शेवटी जुने पोलीस ग्राऊंड येथे सांगता करण्यात आली.
 
मोटारसायकल रॅली शहरातील तसेच ग्रामीण भागातील हिंदु धर्माभिमानी, सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळांचे तसेच विविध समाजाचे पदाधिकारी युवक - युवती पारंपारिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते.
 
फेरीच्या मार्गावर भाजपचे शराध्यक्ष मोहन खानवाणी, मोठा मारुती मंदिराचे पुजारी, भगवती हॉटेलचे संचालक जितेंद्र मराठे, योगेश्वर प्रोव्हीजनचे रामभाऊ पाटील, धनराज चौधरी, सचिन ज्वेलर्सचे संचालक आशिष सराफ, भटू महाजन, नानासाहेब रोकडे, भरत माळी, योगेश महाजन, राम महाजन यांनी पुष्पवृष्टी केली. फेरीच्या सांगता प्रसंगी रविवारी होणार्‍या सभेला स्वत:समवेत प्रत्येकाने जास्तीत जास्त धर्माभिमानी हिंदूंना घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121