अवकाशातला अढळ तारा

Total Views | 3
 
 
 
’आर्यभट्ट’ या उपग्रहाचे नाव जरी घेतले तरी पहिल्या क्षणी आठवतात ते प्रा. उडुपी रामचंद्र राव म्हणजेच, यू.आर.राव. देशातील वैज्ञानिक संस्थांना फारशी माहिती नसतानाही ‘आर्यभट्ट’ हा उपग्रह अवकाशात झेपावला आणि भारताने अवकाश विज्ञान क्षेत्रात एक पाया रचला. बंगळुरूमधील एका औद्योगिक केंद्रात राव यांनी आपली प्रयोगशाळा उभारली आणि त्यातूनच ’आर्यभट्ट’ या उपग्रहाचा जन्म झाला. मात्र, राव यांच्या निधनानंतर अवकाश विज्ञान क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
 

 
राव यांना त्यांच्या कामामुळे जगभरात ओळखले जाते. ‘आर्यभट्ट’च्या निर्मितीपासून ते मंगळ ग्रहाच्या अभियानापर्यंत राव यांनी ‘इस्रो’च्या प्रत्येक अभियानामध्ये आपले अमूल्य योगदान दिले. ‘आर्यभट्ट’ या उपग्रहापासून तब्बल आणखी २० उपग्रहांचे डिझाईन आणि त्याचे यशस्वी प्रक्षेपणदेखील त्यांनी केले. ७०च्या दशकात उपग्रह बांधणीला येणारा तीन कोटींचा खर्च वाचवण्यासाठी राव यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी अमेरिकेच्या उपग्रहाने केरळमधील झाडांवर पडलेल्या रोगांची टिपलेली छायाचित्रेही त्यांना दाखविण्यात आली होती. राव यांच्या योगदानाबद्दल त्यांना सर्वश्रेष्ठ अशा ’पद्मविभूषण’ आणि ’पद्मभूषण’ या पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आजवर तब्बल ३२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
यू. आर. राव यांचा जन्म १० मार्च १९३२ रोजी उडुपीतील अडमारू या गावी झाला. त्यांनी १९५१ साली मद्रास विद्यापीठातून विज्ञान विषय घेऊन पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९५३ साली त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस. आणि १९६० साली गुजरात विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एमआयटी, टेक्सास विद्यापीठ आणि डलासमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कर्तव्य बजावले. यानंतर त्यांनी अनेक अंतराळ अभियानांमध्ये आपले योगदान दिले. १९८४ पासून दहा वर्षे त्यांनी ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांनी विविध विषयांवर ३५० शोधनिबंधदेखील लिहिले होेते. तसेच त्यांना २१ विद्यापीठांकडून डॉक्टरेट देखील प्रदान करण्यात आली होती. याव्यतिरिक्त २०१३ साली वॉशिंग्टन येथे सॅटेलाईट हॉल ऑफ फेममध्ये, तर २०१६ मध्ये मेक्सिकोतील गुडालराजा येथे ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना स्थान देण्यात आले. अशा या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रकाशमान तार्‍याला सदैव भारत स्मरणात ठेवेल.
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121