महाराष्ट्रात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील संपूर्ण राजकीय वातावरण विरोधात असताना, त्या राजकारणाच्या धामधुमीत नुसते टिकून राहणे अशक्य आहे, असे वाटत असताना, आपल्या बुद्धिचातुर्य, संयम आणि वेगवान राजकीय डावपेचांच्या बळावर ङ्गमी पुन्हा येईनफ हे आपले विधानसभेतील वाक्य खरे करून दाखवणारा कार्यक्षम लोकनेता म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस!
आजूबाजूला अनेक सत्तापिपासू राजकीय नेते दिसत असताना, सर्वत्र मी, माझे कुटुंब, माझा परिवारफ इतकीच प्राथमिकता असणारे राजकारणी दिसत असताना, राष्ट्रप्रथमफ ही प्राथमिकता घेऊन चालणारे देवेंद्रजी उठून दिसतात. राजकारणात स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि धडाडीची निर्णयक्षमता लाभलेला नेता म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चितच एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, ज्यात मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरासाठी समृद्ध आणि दीर्घकालीन पायाभूत विकासाचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.
त्यांचे वडील आमदार होते. त्यांच्या काकू मंत्री होत्या. मात्र, देवेंद्रजी त्या आधारावर राजकारणात आले नाहीत. विद्यार्थी असतानाच त्यांनी रा. स्व. संघाच्या सेवाकार्यात आणि अभाविपच्या अनेक आंदोलनांतही सहभाग घेतला. देवेंद्रजी श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनफ, अभाविपचे काश्मीर बचाव आंदोलनफ यात सक्रिय सहभागी झाले. त्यांना ङ्गअभाविपफचे दीर्घकाळ काम करायचे होते. मात्र, नागपूर भाजपने त्यांना मागून घेतले आणि अत्यंत तरुण वयात ते नगरसेवकपदी निवडून आले. सर्वांत तरुण महापौरही झाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. राजकारणात वेगळ्या शैलीने स्वतःचे स्थान निर्माण करणारे देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून अफाट लोकप्रिय ठरले. जनतेशी थेट संवाद साधण्याची त्यांची अनोखी शैली जनतेला भावली.
राज्यात खर्या अर्थाने बेरजेचे राजकारण करणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता त्यांना ओळखू लागली आहे. समाजाच्या विविध घटकांत विविध मुद्द्यांवरून सातत्याने फूट पाडत, वर्षानुवर्षे स्वतःची राजकीय दुकानदारी चालविणार्या राज्यातील दिग्गज नेत्यांना देवेंद्रजींनी दिलेला धोबीपछाड राज्यातच नव्हे, तर देशात कौतुकाचा विषय ठरला आहे. सर्व समाजघटकांत आणि सर्व राजकीय पक्षांमध्येही असलेली देवेंद्रजींची स्वीकारार्हता विरोधकांची डोकेदुखी ठरली आहे आणि हे सर्व राजकारण कठोरपणे करतानाच देवेंद्रजींनी सरकारी प्रशासनात आणलेली संवेदनशील पारदर्शकता आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतो.
खरा मुंबईकर...
राज्यातील दशकानुशके सत्तेत असलेल्या काँग्रेसने राजधानी मुंबईकडे नेहमीच अक्षम्य दुर्लक्ष केले. मात्र, देवेंद्रजींनी राज्यासोबतच मुंबईच्या केलेल्या नियोजनबद्ध विकासातून आपण ङ्गखरे मुंबईकरफ असल्याचे दाखवून दिले आहे. विविध मेट्रो मार्गिका, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक(अटल सेतू), नवी मुंबई विमानतळ अशा प्रकल्पांनी मुंबईचे भवितव्य सुरक्षित केले आहे. मुंबईतील राजकीय गुंडगिरी आणि मुंबई मनपातील भ्रष्टाचार रोखत, मुंबईकरांचे आयुष्य सुखकर व्हावे, म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मुंबईकरांच्या पुढील कित्येक पिढ्या त्यांचे ऋणी राहतील.
मुंबई शहरातील भव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांची धाडसी अंमलबजावणी त्यांनी प्रेरणादायी ठरवली आहे. विविध मेट्रो मार्ग, कोस्टल रोड, सागरी महामार्ग, टनेल्स यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची वेळेत पूर्तता करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. मुंबई महानगरातील ङ्गमल्टीमॉडल ट्रान्सपोर्टफचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड आणि शहरातील प्रत्येक घटकाला ङ्गएक नवचैतन्यफ देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
राज्याचा चौफेर शाश्वत विकास राज्याच्या प्रगतीमधील त्यांची दूरदृष्टी विशेष आदर्शवत आहे. स्मार्ट शहरांची संकल्पना, ङ्गजलयुक्त शिवारफसारखी महत्त्वाकांक्षी, पण सहजतेने साध्य होणारी पाणीव्यवस्थापन योजना, जलअभियांत्रिकीचा उत्तम नमुना ठरू शकेल, अशी ङ्गमराठवाडा वॉटरग्रीड योजनाफ, ङ्गसमृद्धी महामार्गफ, शक्तिपीठ महामार्ग, वाढवण बंदर प्रकल्प, राज्यात विविध ठिकाणी होत असलेली उद्योग उभारणी यातून देवेंद्रजींनी राज्याला दिलेली समृद्धीची दिशा ही अपरिवर्तनीय, परंतु, शाश्वत विकासाची आणि राज्याला अव्वल स्थानी नेणारी आहे.
अंत्योदयाचा सच्चा वाहक
पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवलेल्या अंत्योदयाच्या मार्गावर चालणारा सच्चा कार्यकर्ता म्हणूनही देवेंद्रजी ओळखले जातात. कोविड काळात शासन प्रशासन आणि जनता संभ्रमित असताना स्वतः देवेंद्रजींनी विरोधी पक्ष नेता असतानाही पुढाकार घेऊन जनतेत विश्वास निर्माण केला. कोविड काळातील सेवाकार्याचे अग्रेसर राहून नेतृत्व करताना स्वतःला कोविडफ झाल्यावर ते उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात भरती झाले. त्यांच्या या एका कृतीने त्या कठीण काळात जनतेत प्रचंड विश्वास निर्माण झाला. शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम राहावी आणि सामान्य जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळावी, म्हणून कोरोनाच्या कठीण काळात विरोधी पक्षनेते असूनही देवेंद्रजींनी केलेले प्रयत्न महाराष्ट्रातील जनतेचे आणि आरोग्य यंत्रणेचे मनोबल उंचावून गेले. सामान्य नागरिकाला उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, याकरिता त्यांनी पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू केलेला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष कमालीचा यशस्वी ठरला. सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी तातडीची आर्थिक मदत या कक्षाकडून आजही देण्यात येत आहे. हजारो नागरिकांना या वैद्यकीय मदत कक्षाचा उपयोग होत आहे.
अंत्योदयाच्या मार्गावरचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आज गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारून नक्षलवाद मोडून काढतानाच तेथे शाश्वत विकासाची गंगा प्रवाहित करणारे, सर्वसामान्य आदिवासी जनतेला आरोग्यसेवा, रस्ते बससेवा आणि सुरक्षा पुरविणारे देवेंद्रजी देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री न ठरले तरच नवल होते.
प्रखर हिंदुत्ववादी
मुंबईसह राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणारे देवेंद्रजी तसे आहेत प्रखर हिंदुत्ववादी! राज्यात दुर्दैवाने फोफावत असलेली लव्ह जिहादची प्रकरणे असोत की, धार्मिक स्थळे आणि गड-किल्ल्यांवरची अतिक्रमणे असोत, देवेंद्रजींनी या विषयांवर कडक भूमिका घेतली आहे. ङ्गलव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याकरिता सात सदस्यीय उच्चाधिकार समिती नेमली गेली आहे. फसवणुकीने आणि जबरदस्तीने होणारी धर्मांतरणे रोखण्यासाठी प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या आहेत. धर्मांतर करूनही हिंदू मागासवर्गीय आरक्षणाचे फायदे लाटणार्यांना रोखण्यासाठी आता धर्मांतरितांना मागासवर्गीय सवलतींचा लाभ घेता येणार नसल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. गड, किल्ले आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे. विविध प्रकारे राज्यात धार्मिक तणाव भडकावू पाहणारे गुंड गजाआड धाडले गेले आहेत. प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्याची जनतेची मागणी कठोरपणे परंतु, गाजावाजा न करता पूर्ण करणारे देवेंद्रजी म्हणूनच राज्याच्या कानाकोपर्यात लोकप्रिय ठरत आहेत.
शिवरायांच्या 12 किल्ल्यांना नुकतेच युनेस्कोफचे जागतिक वारसा मानांकनफ प्राप्त झाले आहे. त्याकरिता स्वतः देवेंद्रजींनी केंद्रीय स्तरावर केलेले प्रयत्न आणि अधिकार्यांना दिलेला पाठिंबा हे आम्ही अनुभवले आहेत.श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाफत आणि काश्मीर बचाव आंदोलनाफत सक्रिय सहभाग असलेले देवेंद्रजी आज राज्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रखर देशभक्तीपर निर्णय राबविताना आपण पाहात आहोत.
सर्वपक्षीय अनुयायी असलेला कुशल प्रशासक
पाच वर्षांची मुदत पूर्ण करणारा राज्याच्या अलीकडच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री, कुशल प्रशासक, मुत्सद्दी नेता आणि राजकीय दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून राज्याच्या राजकारणात देवेंद्रजींनी एक नवीन मापदंड तयार केला आहे. त्यांना लाभलेले सर्वपक्षीय अनुयायी हे आजच्या काळातील एक मोठे राजकीय आश्चर्य आहे.
देवेंद्रजींनी प्रसंगी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून अवघड काळात भाजपला पुन्हा सत्तेच्या शिखरावर नेले. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाताला सामोरे जाताना त्यांनी अतिशय संयम, मुत्सद्देगिरी आणि राजकीय परिपक्वता दाखवत महाराष्ट्रात भाजपचा पाया अधिक मजबूत केला. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्र पुन्हा प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे आणि राजकीय स्थिरता अनुभवत आहे. राज्याच्या सर्व भागांत आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता लाभलेले देवेंद्रजी फडणवीस हे आज भाजपचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा चेहरा आहेत, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
देवेंद्रजी यांच्याशी माझे असलेले वैयक्तिक संबंध हे स्नेहाचे, विश्वासाचे आणि परस्परांबद्दल आदराचे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणे हा एक प्रेरक अनुभव आहे. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सक्षम नेत्यांमध्ये परिवर्तित केलेले महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य, यशस्वी नेतृत्व आणि उत्तम यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!