मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याची कालमर्यादा वाढवली!

वाचा किती काळ घेता येणार लाभ?

    07-Mar-2025
Total Views | 66

CM Yuva Kaary Prashikshan Yojana
 
मुंबई: ( Devendra Fadanvis on CM  Yuva Kaary Prashikshan Yojana )  कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलत असताना महत्त्वाची घोषणा केली आहे. या योजनेच्या कालावधीस पूर्वी ६ महिने इतकी मर्यादा होती. मात्र, विधानसभा सदस्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री महोदयांनी हा कालावधी ५ महिन्यांनी वाढवून 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा एकूण कालावधी ११ महिने करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यापुढे या कालावधीसाठी कोणतीही वाढ केली जाणार नाही. कारण ही योजना कायमस्वरूपी नोकरीसाठी नसून प्रशिक्षणपर आहे. अनेक तरुण या संधीची वाट पाहत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. तसेच, सरकारी प्रमाणपत्र मिळाल्यास प्रशिक्षित तरुणांना नोकरी मिळवणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
राज्य सरकार युवकांना कौशल्य विकास आणि प्रभावी प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121