दिल्लीत आपला मोठा धक्का! जंगपुरा मतदारसंघातून मनिष सिसोदियांचा पराभव

    08-Feb-2025
Total Views | 65
 
MANISH SISODIA
 
नवी दिल्ली : (Delhi Election Results) दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. त्यांनी यावेळी जंगपुरा मतदारसंघातून ते निवडणूकीच्या रिंगणात होते.
 
मनिष सिसोदिया यांना भाजपच्या तरविंदर सिंग यांनी तब्बल ६०० मतांनी पराभूत केले आहे. कथित दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सिसोदिया अनेक महिने तुरुंगामध्ये होते. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान आम आदमी पक्षासाठी सिसोदिया पराभव हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121