समीर चौघुले आणि 'या' अभिनेत्रीची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र!

    26-Feb-2025
Total Views |

sameer choughule and sai tamhankar unique pairing in gulkand creates buzz


मुंबई : नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व वेलक्लाउड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.

समीर चौघुले म्हणतात, “सई आणि माझी ओळख ‘फू बाई फू’ पासूनची आहे, त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो, परंतु कधीच एकत्र काम केलं नव्हतं. हास्यजत्रेत हास्यरसिक म्हणून ती आमचे स्किट्स बघते, त्यावर प्रतिक्रिया देते. जवळ जवळ ९०० एपिसोड्स तिने पाहिले आहेत. आता ‘गुलकंद’च्या निमित्ताने तिच्यासोबत काम करण्याचा योग आला आणि मी यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि चांगली मैत्रीण आहे.”
सई ताम्हणकर म्हणते, “हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहाणं आणि त्याच्यावर टिप्पणी करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे, कारण त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. त्याच्या कॅरॅक्टरसारखाच तो खूप भोळा आणि विनम्र असल्यामुळे आमचं खूप जमतं. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. तो खरा जेंटलमॅन आहे आणि मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल.”



अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121