राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. ३ मार्चपासून मुंबईत

    24-Feb-2025
Total Views | 37
 
Budget
 
मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार, दि. २६ मार्च या कालावधीत होणार आहे, तर राज्याचा अर्थसंकल्प दि. १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
 
विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, शंभुराज देसाई, आ. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, अ‍ॅड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार, दि. ८ मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. १३ मार्च रोजी होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121