आमदार सुरेश धस यांनी घेतली महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट
22-Feb-2025
Total Views | 109
बीड : (Suresh Dhas) बीडमधील आष्टीचे आमदार सुरेश धस हे परळी शहरातील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले. याआधी त्यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी हत्याप्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर आता ते परळीत दाखल झाले आहेत. यावेळी ते महादेव मुंडे यांचे कुटुंबियांची भेट घेतली आहे.
महादेव मुंडे यांची १४ महिन्यांपूर्वी हत्या झाली होती त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा पहिल्यांदाच सुरेश धस यांनी परळीत जाऊन भेट घेतली आहे. यावेळी मुंडे यांच्या कुटुंबियांनी आपली कैफियत सुरेश धस यांच्यासमोर मांडली आहे. अत्यंत क्रूरपणे महादेव मुंडेंची हत्या झाली, त्यानंतर हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. सोमवारपर्यंत आरोपी पकडा नाहीतर मंगळवारपासून आंदोलन करु, असा इशारा यावेळी मुंडे कुटुंबियांनी दिला आहे. तसेच पोलिसांच्या तपासावरही कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. या भेटीनंतर सुरेश धस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र यानंतर आता पहिल्यांदाच सुरेश धस हे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही प्रकरणासंबंधित घेतलेल्या या भेटीनंतर सुरेश धस पुढे काय पाऊल उचलणार याकडे लक्ष असणार आहे.