अवैध जमिनीवर बुलडोझर फिरवत प्रशासनाची कारवाई, १२ दुकाने मशीद समितीची असल्याचा दावा

    14-Jan-2025
Total Views | 16
 
 bulldozers
 
संभल : उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये जुबैद नावाच्या कट्टरपंथीने सती मठाच्या अवैध जमिनीवरील दुकानांवर बुलडोझरची कारवाई केली आहे. याठिकाणी ८० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीरपणे अवैधरित्या दावा करण्यात आला होता. यामुळे मठाच्या शेजारी असलेल्या जागेवर करण्यात आलेल्या कब्जामुळे हद्दीत वाढ निर्माण झाली होती. तक्रारीवरून प्रशासनाने अवैध दुकानांवर बुलडोझर फिरवर जमिनीचा ताबा सोडण्यास भाग पाडले.
 
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
 
कोतवाली परिसरामध्ये नवीन सराईमध्ये हे प्रकरण घडले आहे. एसडीएम डॉ. वंदना मिश्रा म्हणाल्या की, जमिनीवर अवैधरित्या आक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. अवैधरित्या बळकवण्यात आलेल्या सती मठाच्या जमिनीवर बुलडोझर फिरवत कारवाई करण्यात आली. एकूण ८० चौरस मीटर जागेवर अवैधरित्या कब्जा करण्यात आला. या प्रकरणाची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी तत्काळ बुलडोझरची कारवाई केली.
 
संभल पोलीस ठाण्यासमोरील असलेल्या मशीद समितीने दुकानांचे रेकॉर्ड जमा करण्यासाठी प्रशासनाकडे वेळ मागितला आहे. नोंदी दिल्यानंतर चौकशी केली जाईल. तपासाणीमध्ये काही अनियमितता आढळून आल्याने संबंधित दुकाने तोडण्याची कारवाई केली जाईल. कारण दुकाने असलेल्या जागी बाजारपेठेमध्ये जाणारा अरूंद रस्ता आहे.
 
याप्रकरणामध्ये पोलीस ठाण्यासमोर असलेली १२ दुकाने मशिद कमिटीची असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या दुकानांची जमीन ही वक्फची मालमत्ता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रशासनाकडे वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनीची यादी आहे. त्या संबंधित यादीमध्ये मशिदीनजीकच्या जमिनीचा उल्लेख नाही. नोंदी न मिळाल्यास किंवा तपासणी गैरप्रकार आढळून आल्यास ही दुकाने पाडली जातील अशी माहिती समोर आली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121