"मोदींनी आपलं वचन पूर्ण केलं!" ओमर अब्दुल्ला यांनी केलं पंतप्रधानांचं कौतुक
13-Jan-2025
Total Views | 139
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात झेड-मोर बोगद्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी नायब राज्यपाल मनोज सिन्हा, उपस्थित होते. अशातच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. जनतेला संबोधित करताना अबदुल्ला म्हणाले की पंतप्रधान मोदी जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी श्रीनगरला आले. जम्मू काश्मीरमध्ये निवडणूका पार पडतील आणि लोक सरकार निवडू शकतील हे वचन देखील आपण पूर्ण केले.
जम्मू काश्मीरच्या लोकांना संबोधित करताना अब्दुल्ला म्हणाले की "पंतप्रधान साहेब, आज या बोगद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात तुमची उपस्थिती या वस्तुस्थितीची साक्ष देते की जे लोक हे हल्ले करतात, ज्यांना या देशाचे भले नको आहे, ज्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि प्रगती पहायची नाही, ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यांना येथे नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागेल. आम्ही त्यांना नेहमीच पराभूत करू आणि येथून परत पाठवू," सोनमार्ग बोगद्याच्या बांधकामादरम्यान ज्या ६ कामदगारांचा मृत्यू झाला, त्यांचे सुद्धा अबदुल्ला यांनी स्मरण केले. अबदुल्ला म्हणाले की सोनमार्ग बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर घाटमाथ्यवरच्या लोकांना खाली यावं लागणार नाही, कारण या बोगद्यामुळे संपूर्ण वर्ष साऱ्या प्रदेशातील लोक एकमेकांशी जोडले जातील.