ई-श्रम कार्ड आणि श्रमिकांसंदर्भात महत्वाची अपडेट्स

    23-Sep-2024
Total Views | 35
epfo-and-e-labour-data-will-be-linked
 
 
मुंबई :      भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) डेटा आणि ई-श्रम पोर्टल डेटा एकत्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कामगार मंत्रालयाने घेतला आहे. यानिर्णयामुळे ईपीएफओ आणि ई-श्रम डेटा जोडला जाईल व असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, ई-श्रम पोर्टलमध्ये असंघटित क्षेत्रातील आणखी २० कोटी कामगारांचा समावेश करून डेटा प्रक्रिया वाढविण्याचा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा प्रयत्न आहे.



दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्रालय ईपीएफओ डेटा आणि ई-श्रम पोर्टल डेटा एकत्रित करण्यासाठी सज्ज असून अधिकाऱ्याने बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, देशातील कर्मचाऱ्यांच्या औपचारिकतेच्या ट्रेंडचे मोजमाप करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे मंत्रालयाचा उद्दिष्ट आहे. डेटाच्या एकत्रीकरणामुळे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांच्या परस्पर हालचालींचा वास्तविक-वेळेवर मागोवा घेण्यात मदत होईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या निर्णयाच्या मदतीने कामगारांच्या कल्याणासाठी लक्ष्यित कल्याणकारी योजना करता येतील. सद्यस्थितीस कामगार मंत्रालय ३० कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ई-श्रमचा मजबूत डेटा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांशी जोडत आहे. सामाजिक सुरक्षा उपायांमध्ये प्रवेश करण्यासाठी एकल विंडो किंवा वन स्टॉप सोल्यूशन म्हणून विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.
 


अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय सैन्याचा सन्मान; मुंबईत महिलांच्या नेतृत्वाखाली ‘सिंदूर यात्रा’

भारतीय सैन्याचा सन्मान; मुंबईत महिलांच्या नेतृत्वाखाली ‘सिंदूर यात्रा’

मंगळवार, दिनांक २० मे २०२५ रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांकडून भारतीय सैन्याच्या शौर्याला मान वंदना देण्यासाठी 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४:३० वाजता गावदेवी, मुंबई येथील मणी भवन येथून सदर यात्रेचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व वीरमाता अनुराधा ताई गोरे व डॉ. मंजू लोढा करणार आहेत. यात्रेत १५०० हून अधिक महिला सहभागी होणार असून, यात शाहिद सैनिकांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्त्या, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित ..

वाढवण बंदरामुळे आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी

वाढवण बंदरामुळे आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा विकास बंदरांमुळे झाला असून जवाहरलाल नेहरू प्राधिकरण विकसित करत असलेले वाढवण बंदर भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सुमारे 3 हजार, 600 एकर जागेत निर्माण होणारे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करणार असल्याची माहिती मुंबईच्या ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथोरिटी’चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी दिली. गोदा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेचे 18 वे पुष्प गुंफताना स्व. लक्ष्मण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121