लष्करी सैन्यांच्या रेल्वेरुळावर तब्बल १० डिटोनेटर , अज्ञात चोरट्यांचा कट
22-Sep-2024
Total Views | 32
भोपाळ : मध्य प्रदेशातील नेपानगर येथे लष्करांची रेल्वे काश्मीरहून कर्नाटक येथे जात होती. यावेळी ही रेल्र्वे मध्यप्रदेशाच्या नेपानगर येथे पोहोचली असता, रेल्वेरूळावर डिटोनेर ठेवण्यात आले होते. ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली आहे. यावेळी लष्करांच्या ट्रेनशी संबंधित एक मोठा कट उघड झाला असल्याची माहिती आढळून आली आहे.
नेपानगर येथे सागफाटा येथे अज्ञातांनी रेल्वेरूळाठिकाणी डिटोनेटर ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वेरुळावर डिटोनेटरने केलेल्या आवाजाने रेल्वेचालक सावध झाला. त्याने रेल्वे थांबवली आणि स्टेशन मास्टरांना या घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळतात, रेल्वे आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास केला. यावेळी घडलेली घटना ही लष्कराशी संबंधित असून याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
या तपासात रेल्वे रूळावर ठेवण्यात आलेले डिटोनेटर हे आरडीएक्स डिटोनेटर नसून त्यातून केवळ आवाज येतो. ट्रेनच्या लोको पायलटला सावध करण्यासाठी आवश्यकतेनुसार रेल्वे रूळावर आवाज काढण्यासाठी याचा वापर केला जातो. या घटनेत रेल्वेकडून डिटोनेटर ठेवण्यात आले नव्हते. अज्ञात चोरट्यांनी डिटोनेटर रेल्वेरूळावर ठेवले होते.
दरम्यान डिटोनेटर्सचा स्फोट होतो त्यावेळी त्याचा बॉम्बसारखा मोठा आवाज येत नसून त्यातून फक्त आवाज येतो. यामुळे पायलटल सावध होतो. दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून यामागील कट रचणारे समोर येतील.