मशिद हे मुस्लीमांचं धार्मिक स्थळ त्यांना विश्वासात घेऊनच कारवाई केली पाहिजे : किशोरी पेडणेकर
21-Sep-2024
Total Views | 66
मुंबई : मशिद हे मुस्लीमांचं धार्मिक स्थळ आहे. त्यांना विश्वासात घेऊनच कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्य उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. धारावी परिसरात सध्या मुंबई महापालिकेने धारावीतील एका मशिदीच्या अवैध भागावर कारवाई केल्याने तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "ज्यापद्धतीने जातीजातींमध्ये तेढ वाढवली जात आहे, असं न करता गुण्यागोविंदाने राहायला हवं. धारावीचा विकास करायचा असल्यास स्थानिकांचं त्याच जागेवर पुर्नवसन झालं पाहिजे. मशिद हे मुस्लीमांचं धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन कारवाई केली पाहिजे," असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, धारावीत असंख्य लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महापालिकेच्या गाड्यांची तोडफोडही केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. खासदार वर्षा गायकवाड यांनी या कारवाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना निवेदनही दिलं होतं.