"लोकसभेमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी..."; संजय राऊतांचं विधान
20-Sep-2024
Total Views | 57
मुंबई : लोकसभेमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी तिन्ही पक्षाने एकत्र काम करावं लागले, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीकाही केली. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, "लोकसभेमुळे केवळ काँग्रेसचाच नाही तर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. आता विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी तिन्ही पक्षाने एकत्र राहून परत काम करावं लागेल. त्यांचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाही. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर कुणाला तो वाढल्यासारखा वाटत असेल तर हा आत्मविश्वास कसा आहे, हा अभ्यासाचा विषय आहे," असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात सध्या बैठका सुरु आहेत. प्रत्येक जागेवर आमची चर्चा सुरु असून जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला ती जागा मिळणार आहे, अशी माहितीही संजय राऊतांनी दिली आहे. मविआतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.