राऊत! मविआत लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय नाही! नाना पटोलेंनी सुनावले

    20-Sep-2024
Total Views | 65
 
Raut & Patole
 
मुंबई : मविआत लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय नाही. तुम्ही राऊतांचं फार ऐकत जाऊ नका, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी संजय राऊतांना सुनावले आहे. कुणाला आम्ही मोठे भाऊ आहोत असं वाटत असेल तर त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे? हे लक्षात घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर पटोलेंनी प्रतिक्रिया दिली.
 
नाना पटोले म्हणाले की, "महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि लोकसभेचा निकाल पाहता काँग्रेसचाच स्ट्राईक रेट जास्त राहिल. जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी २८८ जागा लढणार असून मेरिटच्या आधारावर जागावाटप व्हावं ही आमची भूमिका आहे. त्यामुळे यात लहान भाऊ, मोठा भाऊ असं काही नाही. आमच्यात काहीही वाद नाही. तुम्ही संजय राऊतांचं फार ऐकू नका," असे ते म्हणाले.
 
काय म्हणाले संजय राऊत?
 
"काँग्रेस पक्षाला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कुणाला आम्ही मोठे भाऊ आहोत असं वाटत असेल तर त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे? हे त्यांनी लक्षात घ्यावं. कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली. या तीन जागा शिवसेनेमुळे वाढल्या आहेत. ते जर हे विसरले असतील तर योग्य नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121