राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र निषेध

राहुल गांधींच्या पुतळ्याला जोडे हाणले

    14-Sep-2024
Total Views | 23

Rahul gandhi
 
ठाणे, दि.१४ : प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी केलेल्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. ठाण्याच्या कोर्ट नाका येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी केलेल्या या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना महिला आघाडीने राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला.
 
अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानेही राहुल गांधींचा निषेध केला. संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाच्या असंवेदनशिलतेचा नमुना असल्याचे शिवसेना महिला आघाडीने म्हटले आहे. तेव्हा, राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घेऊन देशवासियांची माफी मागावी, अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
 
यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, प्रकाश शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे आदीसह माहिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121