शिमलात संजैली येथे अवैध मशीदीप्रकरणी हिंदू व्यापारी उतरले रस्त्यावर
12-Sep-2024
Total Views | 49
शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील संजैलीत मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात बुधवारी हिंदू संघटनांनी केलेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा शिमला व्यापारी मंडळाने निषेध केला आहे. शिमला व्यापारी संघटनेने १२ सप्टेंबर रोजी दुपारी १० ते १ वाजण्याच्या सुमारास शहरातील बाजारपेठा बंद ठेवल्या. लाठीचार्जच्या निषेधार्थ कामगार संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाने आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निदर्शनात शहरातील दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान शिमल्यात अवैध मशीदीप्रकरणी हिंदू संघटनांनी निदर्शने दर्शवली. यावेळी प्रशासनाने कलम ११६ लागू केला. तेव्हा संजौली येथे हजारोंचा जमाव जमला होता. त्यांनी बेकादेशीर असलेली मशीद पाडा अशी मागणी केली. यावेळी संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला करत पाण्याची फवारणी केली होती.
यावेळी पोलिसांनी केलेल्या या हल्ल्यात आणि दगडफेकीत ६ पोलीस कर्मचाऱ्यांसह १२ जण जखमी झाले. यावेळी अनेकांना दुखापत झाली होती. आंदोलकांना रोखत असताना पोलिसांच्या नाकी नऊ आले. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स लावत जमावास रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घडलं भलतंच, घटनास्थळावरील उपस्थितांनी बॅरिकेड्स तोडून संताप व्यक्त केला.
मशीदीच्या काही अंतरावर आल्यानंतर पोलिसांनी दुसरे बॅरिकेड लावले होते. मात्र यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी दुसरेही बॅरिके़ड तोडले. तेव्हा धक्काबुक्की झाली, वातावरणाने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी अग्निशमन गाड्यांच्या मदतीने जोरदार पाण्याच्या तोफांचा वापर करून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पोलिसांनी दोनदा लाठीमार केला. मात्र तरीही गर्दी निवळली नाही. यावेळी आंदोलकांसमोर पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले होते.