केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन

    10-Sep-2024
Total Views | 34

chenda melam 
 
मुंबई : पुण्यातील 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट' आणि 'सुवर्णयुग तरुण मंडळ' यांच्यावतीने यंदा गणेशोत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात लोकप्रिय केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते.
 
'चेंदा मेलम' वाद्य
 
चेंदा मेलम हे केरळ राज्यातील एक प्रसिद्ध दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे वाद्य तेथील संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून देखील ओळखले जाते. चेंदा मेलम हा पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेला ताल संगीताचा एक कलात्मक प्रकार आहे. ह्या वाद्यास केरळमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय वाद्य म्हणून मान्यता आहे. कथकली, कोडियट्टम, थेय्याम इत्यादी जवळजवळ सर्व केरळ कला प्रकारांसाठी चेंदा मेलम हेच तालवाद्य म्हणून वापरले जाते.
 
चेंदा मेलम हे वाद्य केरळच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे पारंपारिक आणि उत्सवपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी वापरले जाते. अश्या ह्या वाद्य वादनाचा कार्यक्रम पाहण्याचा व ऐकण्याचा आनंद पुणेकरांना या गणेशोत्सवात घेता आला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121