सूर्यकिरणांनी न्हाऊन निघणारा 'रांजणगावचा महागणपती'

    14-Sep-2024
Total Views | 25

ranjangav mahaganpati 
अष्टविनायकांपैकी चौथा गणपती म्हणजे पुण्यातील ‘रांजनगावचा गणपती’. या गणपतीला ‘महागणपती’ म्हणून ओळखले जाते. हा महागणपती नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.  या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी देशभरातून अनेक भाविक येतात. 
 
मंदिराचे वैशिष्ट्य :
या मंदिराची रचना वैशिष्टयपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. दक्षिणायण आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याची किरणे गणपतीच्या मूर्तीवर पडतील अशी मंदिराची रचना केलेली आहे. या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्त्या आहेत. मुळ मूर्ती जी ‘महोत्कट’ म्हणून ओळखले जाते परंतु ती मंदिराच्या तळघरात ठेवलेली आहे. मंदिरात पूजेसाठी जी मूर्ती ठेवलेली आहे ती डाव्या सोंडेची आणि आसन घातलेली असून तिचे कपाळ रुंद आहे. शेंदूर लावलेली ही मूर्ती सूर्याची किरणे तिच्यावर पडली की अधिकच आकर्षक भासतात. या मूर्तीच्या शेजारी रिद्धी-सिद्धीची मूर्ती ठेवलेली आहे.
 
मंदिराचा इतिहास:
 या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला आहे. शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मंदिरातील मूळ मूर्तीसाठी तळघर बांधले.
 
मंदिराशी संबंधित पौराणिक कथा:
भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने गणपतीची आराधना करून मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी भगवान शंकरांकडे वळवली. महादेवांकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन महादेव त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व महादेव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. महादेवांनी गणरायाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. महादेवांनी गणेशाचे जेथे स्मरण केले तिथेच गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.
 
कसे पोहोचायचे :
 पुणे स्टेशन आणि शिवाजी नगर येथून मंदिरात पोहोचण्यासाठी नियमित बस सेवा आहेत. पुण्यापासून रांजणगावचे अंतर ५१.४ किमी आहे .रांजणगाव गणपतीसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन उरुळी आहे, जे रांजणगाव पासून सुमारे 16 किमी अंतरावर आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121