मुंबई : 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट, त्यातील पात्र आणि गाणी यांनी प्रेक्षकांना २४ वर्षांनंतरही भूरळ घातली आहे. आजही डोहाळं जेवण असेल तर कुणी तरी येणार येणार गं हे गाणं वाजल्याशिवाय तो कार्यक्रम पुर्ण होत नाहीच. या गाण्याची विशेष खासियत म्हणजे अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा स्त्रीभूमिकेतील डान्स. आणि पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी या गाण्यावर चित्रपटाची टीम पुन्हा एकदा थिरकताना दिसली आहे.
नुकतंच
सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ हे सर्व एकाच मंचावर आले होते. तेव्हा या चौघांनी पुन्हा एकदा 'कुणीतरी येणार येणार गं...' या गाण्यावर ठेका धरला. गाण्यात जरी अश्विनी भावे नसल्या तरी मंचावर त्यांनी नक्कीच या गाण्यावर नृत्य करत धमाल केली. तब्बल ३६ वर्षांनी या कलाकारांनी पुन्हा एकदा 'कुणीतरी येणार गं...' वर डान्स करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांच्या डान्सवर प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच सचिन पिळगांवकर यांना या सिनेमाच्या सीक्वेलविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी लक्ष्याशिवाय चित्रपटाचा सीक्वेल बनूच शकत नाही असं उत्तर देत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सिद्धार्थ रे यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट अजरामर आहे यात शंकाच नाही.