प्राचीन मंदिरात कट्टरपंथी युवकांकडून अश्लिल रिलचं शुटिंग

    03-Aug-2024
Total Views | 98

Reel Shoot
 
 (Photo Credit : Wikipedia) 
 
लखनऊ : उत्तरप्रदेशमधील अमरोह जिल्ह्यात भगवान कृष्णकालीन मंदिरात अश्लिल (Reel Shoot) रिल्स शूट  करण्यात आले. यामुळे अमरोह जिल्ह्यातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अमरोह जिल्ह्यातील युट्यूबर्स दिलशाद आणि अझीम यांच्यावर रिल्स अश्लिल रिल्स बनवल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. २ ऑगस्ट रोजी याप्रकरणाचा तपास सुरू होता. अमरोह येथील कोतवाली नगर पोलीस ठाणे हद्दीत आहे. येथे शुक्रवारी पोलीस उपनिरिक्षक परशुराम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
 
व्हिडीओमध्ये मंदिर दिसत असलेल्या ठिकाणी दोन तरूण दिसत आहेत. यामधील एका तरूणाने महिलांचे कपडे घातलेले दिसत आहेत. या व्हिडीओची चौकशी केली असता, ज्याठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यात आला ते स्थळ अमरोह जिल्ह्यातील असून वासुदेवाचं मंदिर आहे. या दोघांनीही धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवला असल्याचा पोलिसांच्या तपासात आढळून आले.
 
 
 
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. दिलशाद आणि अजीम, अशी रिल्स शूट करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आली. या दोघांवर भारतीय न्यासंहिता कलम (BNS) कलम २९६ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ लावण्यात आले. दोघांचा तपास सुरू आहे. दरम्यान दिलशाद हा सोशल मीडियावर जॉर्डन डीएस हे अकाऊंट हँडल करतो. तो फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर सक्रीय असतो.
 
दरम्यान त्याने एका दुचाकीवरून वेगवान जात असलेले रिल्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दुचाकवरील क्रमांक दिसत नाही. अमरोह जिल्ह्यातील वासुदेव मंदिर हे हिंदूंचे पवित्रस्थान आहे. याच मंदिरात रिल्सच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121